घरदेश-विदेशVideo : जपानमध्ये 'जोकर' च्या वेशात व्यक्तीचा ट्रेनमध्ये हल्ला, १७ प्रवासी जखमी

Video : जपानमध्ये ‘जोकर’ च्या वेशात व्यक्तीचा ट्रेनमध्ये हल्ला, १७ प्रवासी जखमी

Subscribe

जपानची राजधानी टोकियोमध्ये ट्रेनच्या डब्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने जोकरचा वेश परिधान करत प्रवाशांवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात १७ प्रवासी जखमी झाले आहेत. तर आरोपीने ट्रेनमध्ये धुमाकूळ घालत दोन डब्ब्यांमध्ये आग लावली होती. या हल्ल्यात ३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीनं बॅटमॅन कॉमिक्समधील जोकरच्या भूमिकेसारखे कपडे परिधान केले होते. या २४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने रविवारी टोकियो कॉम्प्युटर ट्रेनमध्ये अनेक प्रवाशांवर हल्ला केला. यात तिघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रेनमध्ये आग लावण्यापूर्वी आरोपीने प्रवाशांवर हल्ला केला. हा हल्ला टोकियोतील कोकुर्यो स्टेशनजवळील कीयो ट्रेनमध्ये झाला.

- Advertisement -

 


या हल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आरोपीच्या चाकू हल्ल्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत. आगीपासून वाचण्यासाठी दुसऱ्या डब्ब्यांकडे धाव घेत आहेत आणि खिडक्यांमधून उडी घेत असल्याचे दिसतेय. हल्लेखोर आरोपीने हायड्रोक्लोरिक अॅसिडची फवारणी करत ट्रेनमध्ये आग लावली. या संपूर्ण घटनेमुळे स्टेशन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

या घटनेत अटक केलेल्या संशयित आरोपीने ‘मला मृत्यूची शिक्षा मिळावी, म्हणून मी लोकांना मारू इच्छित होतो’, असं म्हटल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -