चंद्र आणि मंगळावर राहायचं स्वप्न होणार पूर्ण, जपानी संशोधक बनवणार खास ग्लास

आता चंद्र आणि मंगळावर राहणं सोपं होणार असल्याचा दावा जपानमधील संशोधकांनी केला आहे. या ग्रहांवर राहण्यासाठी विशेष ग्लास तयार करण्यात येणार आहे.

moon lunar

फार पूर्वीपासूनच माणसाला अवकाशातील ग्रहताऱ्यांचं आकर्षण आहे. त्यातच, चंद्र आणि मंगळावर जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. चंद्र आणि मंगळावरील हवामानामुळे मनुष्यप्राणी तिथे फारवेळ राहू शकणार नाही, त्यामुळे अवकाशातील या मोहिमा नेहमीच स्वप्नवत राहतात. मात्र, आता चंद्र आणि मंगळावर राहणं सोपं होणार असल्याचा दावा जपानमधील संशोधकांनी केला आहे. या ग्रहांवर राहण्यासाठी विशेष ग्लास तयार करण्यात येणार आहे. (Japan’s Kyoto University Experts Propose Artificial Gravity Habitats For Moon & Mars)

हेही वाचा मंगळावर सापडला रहस्यमय दरवाजा, नासाच्या शास्त्रज्ञांचा शोध

चंद्र आणि मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असतं. पृथ्वीपेक्षाही इथं कमी गुरुत्वाकर्षण असल्याने मानवाचं वजन येथे गेल्यावर कमी होऊ शकतं, त्यामुळे माणूस इथं अधांतरी हवेत उडत राहतो. तसेच, कमी गुरुत्वाकर्षणाच्या ठिकाणी गेल्याने मानवाला ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो. तसेच, हाडंही ठिसूळ होतात. मात्र यावरच जपानी संशोधकांनी उपाय शोधला आहे. या उपायामुळे चंद्र आणि मंगळावर राहणं सोपं होणार आहे. इलॉन मस्क यांच्याकडूनही चंद्रावर राहण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या संशोधनाविषयी अद्यायवत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जपानमधील संशोधकांकडून सुरू असलेल्या संशोधनाकडे खगोलप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.

चंद्र आणि मंगळावरील गुरुत्वाकर्षणाच्या समस्येवर उपाय मिळाला असल्याचा दावा जपानी संशोधक आणि इंजिनिअर्सने केला आहे. क्योटो विद्यापिठाचे संशोधक आणि इंजिनिअर्स, काजिमा कॉर्पोरेशन यांच्यामार्फत प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या दोघांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित माहिती देण्यात आली.


चंद्रावर राहण्यासाठी गुरुत्वाकर्षणाविरोधात लढण्याची तयारी मानवी शरिराची हवी. त्यासाठी एक खास ग्लास इमारतीप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे चंद्रावरही पृथ्वीप्रमाणेच गुरुत्वाकर्षण तयार होऊ शकेल. २१ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लुनार ग्लास बनवण्याची योजना असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

लुनार ग्लासनंतरचा भाग येतो तो Core Biome Complex चा. यामुळे एक इकोसिस्टिम तयार करण्यात येणार आहे. लुनार ग्लास आणि मंगळ ग्लास स्ट्रक्चरपासून एक घर तयार करण्यात येणार आहे. हे अत्यंत खास पद्धतीचं घर असणार आहे. या घरांमुळे चंद्र आणि मंगळासारख्या ग्रहांवर माणसाला राहणं शक्य होणार आहे.

या इकोसिस्टमचा तिसरा भाग म्हणजे एलिमेंट हेक्सागॉन स्पेस ट्रॅक किंवा हेक्सा ट्रॅक आहे. हा एक हायस्पीड ट्रान्सपोर्टेशन इंफ्रास्ट्रक्चर आहे. ज्यामुळे चंद्रावर एकमेकांमध्ये कनेक्ट राहता येईल. तसेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणं शक्य होणार आहे.