घरताज्या घडामोडीकोरोनानंतर जपानमध्ये आणखी एका महामारीचा हाहाकार, पक्ष्यांना ठार मारून गाडण्याचे आदेश

कोरोनानंतर जपानमध्ये आणखी एका महामारीचा हाहाकार, पक्ष्यांना ठार मारून गाडण्याचे आदेश

Subscribe

एका बाजूला संपूर्ण जग कोरोना व्हायरससारख्या महामारीच्या संकटाशी सामना करत आहे. तर दुसऱ्या बाजूला जपानमध्ये बर्ड फ्लूने भयानक रुप धारण केले आहे. जपानमधील १० राज्य या बर्ड फ्लूमुळे प्रभावित झाले आहेत. जास्त स्तरावर बर्ड फ्लूचा परिणाम होत असल्यामुळे मोठ्या संख्येने पक्ष्यांना ठार मारून त्यांना गाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जपानचे कृषी मंत्रालयाने सांगितले की, ‘जवळपास ११ हजार पक्ष्यांना ठार मारून गाडले आहेत. दक्षिण-पश्चिम जपानचे शिगा प्रांतामधील हिगाशीओमी शहरातील एका पोलेट्री फॉर्मधील अंड्यातून एव्हीयन इन्फ्लूएन्झा पसरल्यानंतर पक्ष्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कागावा प्रांतामध्ये बर्ड फ्लूचा नवा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात याची सुरुवात झाली होती.’

संयुक्त राष्ट्रच्या खाद्य व कृषी संस्था (एफएओ)च्या माहितीनुसार, जपान आणि जपानच्या शेजारील दक्षिण कोरियात फैलाव झालेली ही महामारी जगभरातील कोंबड्याच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. दोन वेगवेगळ्या उच्च रोगजनक एव्हीयन इन्फ्लूएन्झा (एचपीएआई)मधील एक आहे. हा रोग पहिल्यांदा युरोपमधील जंगली पक्ष्यांमध्ये आढळला होता.

- Advertisement -

एफएओचे एक वरिष्ठ पशु आरोग्य अधिकारी मधुर ढींगरांनी सांगितले की, ‘जपानमध्ये हा आढळणार व्हायरस अनुवांशिकरित्या अलीकडील कोरियातील व्हायरस आणि २०२०मधील सुरुवातीच्या युरोपातील व्हायरसशी संबंधित आहे. याचा अर्थ असा आहे की, सध्या पूर्व आशिया आणि युरोपात दोन वेगवेगळे एच-५, एन-८ व्हायरस आहे, जो या महामारीचा फैलाव करत आहे.’

एफएओने आफ्रिकेचा आरोग्य अधिकाऱ्यांना अलीकडेच युरोपात फैलाव झालेल्या बर्ड फ्लू व्हायरसच्या प्रसारापासून वाचवण्यासाठी शेताच्या देखरेखीसाठी अलर्ट जारी केला आहे. जपानमध्ये ४७ प्रांतापैकी १० या व्हायरसमुळे अधिक प्रभावित झाले आहेत. जवळपास ३ मिलियन पक्षी या व्हायरसचे शिकार झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत कोरोना लसीचा दिला पहिला डोस, ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -