घरदेश-विदेशपिकनीकला जाणे पडले महागात, तरूणाने हातोहोत गमावला जीव

पिकनीकला जाणे पडले महागात, तरूणाने हातोहोत गमावला जीव

Subscribe

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी धबधब्यात पडलेल्या माणिकचा शोध घ्यायला सुरूवात केली.

छत्तीसगडच्या जशपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक ३५ वर्षीय तरूणाचा धबधब्यावरून पाय घसरून दुर्देवी मृत्यू झाला. हा तरूण आपल्या परिवारासोबत छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे सहलीला आला होता. धबधब्याचा आनंद घेता घेता पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्याजवळ धोकादायक असलेल्या ठिकाणी जाण्यास सक्त मनाई होती. मात्र तिथे गेल्याने तरूणाचा मृत्यू झाला. माणिक मंडल असे या तरूणाचे नाव आहे. माणिक ज्या ठिकाणी पाय घसरून पडला त्या ठिकाणी पाण्याचा भोवरा होता. धबधब्यावरून पाय घसरल्याने तो थेट पाण्याच्या भोवऱ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी धबधब्यात पडलेल्या माणिकचा शोध घ्यायला सुरूवात केली.

- Advertisement -

मृत माणिक हा अंबिकापूर या गावात राहणारा रहिवासी आहे. माणिक आपल्या परिवारातील ३५ ते ४० जणांसोबत राजपुरी धबधब्यावर सहलीसाठी आला होता. त्यावेळी माणिक धबधब्याचा सर्वाच उंच भागात गेला. तिथे त्याचा पाय घसरून तो धबधब्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत माणिकला एक लहान मुलगा देखील आहे. वडिल धबधब्यात पडल्याने मुलानेही त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. वडिल न भेटल्याने मुलाच्या डोळ्यातूनही अश्रृ वाहू लागले. माणिकच्या घरातील बऱ्याच जणांनी त्याला धबधब्याच्या वरच्या भागात जाण्यास मनाई केली होती. परंतु त्यांचे न ऐकल्याने माणिकने आपले प्राण गमावले. माणिकच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. धबधब्याच्या ठिकाणी पोलिसांनी माणिकचा मृतदेह शोधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नाही. यापूर्वी ही या ठिकाणी जवळपास १२ लोकांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – बाबा का ढाबाने उघडलं नवं रेस्टॉरंट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -