Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशMohammed Shami : रोजा न ठेवल्यामुळे शमी गुन्हेगार; जावेद अख्तर यांनी ट्रोलर्संना सुनावले

Mohammed Shami : रोजा न ठेवल्यामुळे शमी गुन्हेगार; जावेद अख्तर यांनी ट्रोलर्संना सुनावले

Subscribe

दोन दिवसांपूर्वी मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओप्रकरणी उत्तर प्रदेशचे बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी त्याच्यावर टीका केली होती. याप्रकरणी वाद सुरू असतानाच चित्रपट निर्माते, लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी आता मोहम्मद शमीची पाठराखण केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओप्रकरणी उत्तर प्रदेशचे बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी त्याच्यावर टीका केली होती. मोहम्मद शमीने रमजानमध्ये रोजा केला नाही, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक पिताना दिसला. त्याने जाणीवपूर्वक रोजा ठेवला नाही. तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार आहे, असे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी वाद सुरू असतानाच चित्रपट निर्माते, लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी आता मोहम्मद शमीची पाठराखण केली आहे. (Javed Akhtar slams critics for Mohammed Shami not fasting during Ramadan)

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक मारत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनी ट्वीट करताना विराट कोहलीचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, “विराट कोहली जिंदाबाद, आम्हाला सर्वांना तुझा खूप अभिमान आहे.” जावेद अख्तर यांच्या ट्वीटवर युझर्संनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मात्र जावेद अख्तर यांनी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. यानंतर आता त्यांनी मोहम्मद शमीच्या वादाप्रकरणी ट्रोलर्संना सुनावले आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : ‘10,15,20,30 जणांना हाकलायची वेळ आली, तर हाकलून द्या”; राहुल गांधी संतापले

जावेद अख्तर यांनी ट्वीट करताना म्हटले की, “मोहम्मद शमी तू मूर्ख कट्टरपंथी लोकांकडे लक्ष देऊ नको. दुबईत दुपारी कडक ऊन असते. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या मैदानावर तू पाणी पिल्यामुळे या लोकांना त्रास होत आहे. परंतु जो भारतीय संघ संपूर्ण देशाची मान उंच करतो, त्याच संघाचा तु सुद्धा एक भाग आहेस. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत तसेच भारतीय संघासोबत आहेत,” असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4 मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेवण्यात आला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र सामन्यानंतर मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी एक निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, “इस्लामने रोजा करणे कर्तव्य म्हणून घोषित केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून रोजा केला नाही तर तो मोठा पापी आहे. रोजा हे कर्तव्य असूनही मोहम्मद शमीने उपवास केला नाही. शमीने रोजा न ठेवून मोठा गुन्हा केला आहे. तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार आहे, असे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी म्हटले होते.

हेही वाचा – Viral Video : ‘छावा’ बघताच बुरहाणपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम