Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशJaved Akhtar : विराट कोहली जिंदाबाद म्हटल्यावर जावेद अख्तर ट्रोल, युजरच्या कमेंटला जोरदार प्रत्युत्तर

Javed Akhtar : विराट कोहली जिंदाबाद म्हटल्यावर जावेद अख्तर ट्रोल, युजरच्या कमेंटला जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 51 वे शतक पूर्ण केले आणि 14 हजारांहून अधिक धावांचा विक्रमही केला. त्यामुळे विराट कोहलीचे कौतुक होताना दिसत आहे. चित्रपट निर्माते, लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी विराट कोहलीचे कौतुक करताना एक पोस्ट केली. मात्र युझर्संनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जावेद अख्तर यांनीही युझर्संना जोरदार प्रत्युत्तर दिले.

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारताने शानदार विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 51 वे शतक पूर्ण केले आणि 14 हजारांहून अधिक धावांचा विक्रमही केला. त्यामुळे विराट कोहलीचे कौतुक होताना दिसत आहे. चित्रपट निर्माते, लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी विराट कोहलीचे कौतुक करताना एक पोस्ट केली. मात्र युझर्संनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जावेद अख्तर यांनीही युझर्संना जोरदार प्रत्युत्तर दिले. (Javed Akhtar trolled after Virat Kohli said Zindabad)

भारताच्या विजयानंतर ट्वीट करताना  आणि पाकिस्तानच्या पराभवानंतर जावेद अख्तर यांनी ट्वीट करताना म्हटले की, “विराट कोहली जिंदाबाद, आम्हाला सर्वांना तुझा खूप अभिमान आहे.” मात्र जावेद अख्तर यांच्या ट्वीटवर युझर्संनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युझर्सने कमेंट करताना म्हटले की, “जावेद, बाबर का बाप कोहली है. बोलो, जय श्रीराम.” युझर्सच्या या कमेंटवकर जावेद अख्तर संतापले. कत्यांनी म्हटले की, मी तर फक्त एवढेच म्हणेन की तू एक नीच व्यक्ती आहेस आणि नीच म्हणूनच मरशील. देशप्रेम काय असतं हे तुला काय माहिती? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. यानंतर आणखी एका युझर्सने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Ind VS Pak : पाकिस्तान हरतोय पाहून चाहता भारताच्या बाजूने झाला, व्हिडीओ होतोय व्हायरल


दुसऱ्या युझर्सने कमेंट करताना म्हटले की, “आज सूर्य कुठून उगवला आहे? आतून तुम्हाला दु:ख होत असेल ना.” युझर्सच्या या कमेंटवर जावेद अख्तर यांनी म्हटले की, “बेटा जेव्हा तुझे वडील, आजोबा इंग्रजांचे बूट चाटायचे तेव्हा माझे वडील-आजोबा देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात आणि काळ्या पाण्याच्या शिक्षेत होते. त्यामुळे माझ्या नसानसांत देशप्रेमींचे रक्त आहे आणि तुझ्या नसानसांत इंग्रजांच्या नोकरांचे रक्त आहे. या फरकाला विसरू नकोस, असे म्हणत जावेद अख्तर यांनी युझर्सला सुनावले.

लोकांचा जावेद अख्तर यांना पाठिंबा 

जावेद अख्तर यांनी दोन्ही युझर्संना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर अनेक युझर्संनी त्यांना पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी अशी प्रतिक्रिया दिली की, अज्ञानी लोक एका ज्येष्ठ कलाकाराला त्याची देशभक्ती सिद्ध करण्यास सांगत आहेत, हे खूप दुःखद आहे. दुसऱ्या युझर्सने म्हटले की, “हे लोक वाईट आहेत आणि कधीही सुधारणार नाहीत. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.”

हेही वाचा – IND vs PAK : भारतीय संघाने केला पाकिस्तानचा पराभव, दिल्ली पोलिसांनी उडवली टर