घरदेश-विदेशकाश्मीरच्या नियंत्रण रेषेवर जवानांनी साजरा केला नाताळ सण; व्हिडिओ व्हायरल!

काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर जवानांनी साजरा केला नाताळ सण; व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

भारतीय जवानांनीसुद्धा गोठवणाऱ्या थंडीत नाताळ सण साजरा केला. भारतीय जवान नाताळ सण साजरा करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

आज संपूर्ण जगात नाताळ सणाची धूम पहायला मिळत आहे. येशूंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्मिय नाताळ सण साजरा करतात. या निमित्त आप्तेष, मित्रमंडळींना शुभेच्छा आणि भेटवस्तूंचे आदान-प्रदान करण्यात येते. असे असताना भारतीय जवानांनीसुद्धा गोठवणाऱ्या थंडीत नाताळ सण साजरा केला. भारतीय जवान नाताळ सण साजरा करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये सैनिकांमधील नाताळ सणाचा उत्साह पहायला मिळत आहे. एका वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या मध्ये काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर बर्फाच्छादित प्रदेशात भारतीय सैनिक नाताळचा सण साजरा करत आहेत. यामध्ये ते ‘जिंगल बेल्स जिंगल बेल्स’ हे गाणं गुणगुणताना दिसत असून स्नो मॅन आणि सँटाक्लॉजसुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

सँताक्लॉज सांगतोय वाहतुकीचे नियम

नाताळ निमित्त अनेक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण या सर्वामध्ये गोठवणाऱ्या थंडीतील भारतीय सैनिकांचे नाताळचे सेलिब्रेशन लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला गर्दी होत आहे. तेव्हा येथे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चक्क वाहतूक पोलिसांनी सँताक्लॉजचा वेश परिधान करत वाहतुकीचे नियम सांगत आहेत.

पाहा फोटोगॅलरी – माटुंग्यातील डॉन बॉस्को चर्चमध्ये नाताळचं सेलिब्रेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -