घरक्रीडाजय शाहांनी श्रीलंका क्रिकेट उद्ध्वस्त केले; माजी कर्णधाराचे गंभीर आरोप, अमित शाहांनाही...

जय शाहांनी श्रीलंका क्रिकेट उद्ध्वस्त केले; माजी कर्णधाराचे गंभीर आरोप, अमित शाहांनाही धरले जबाबदार

Subscribe

नवी दिल्ली : 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत आयसीसीने श्रीलंकेचे सदस्यत्व रद्द केल्याची अधिकृत घोषणा केली. आयसीसीच्या या कारवाईनंतर श्रीलंका संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. तसेच जय शाहा यांचे वडील आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाहा यांनाही जबाबदार धरले आहे. (Jay Shah ruined Sri Lankan cricket Ex-captain Arjun rantunga serious allegations Amit Shah is also held responsible)

जय शाह श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत असल्याचा आरोप केला. तसेच संपूर्ण क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त केल्याचा आरोपही अर्जुन रणतुंगा यांनी केला. त्यामुळेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे. आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द केले आहे. त्यामागे मंडळातील राजकीय हस्तक्षेप असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Virat Kohli Wicket viral: नेदरलँडच्या स्पिनरने कोहलीला केलं क्लीन बोल्ड; विराटनं केलं कौतुक, दिलं ‘हे’ खास गिफ्ट

बोर्डाचे अंतरिम अध्यक्ष अर्जुन रणतुंगा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, श्रीलंका क्रिकेट अधिकारी आणि जय शाह यांच्यातील संबंधांमुळे ते श्रीलंका क्रिकेट बोर्डावर नियंत्रण ठेवू शकतता आणि क्रिकेट बोर्ड रद्दही करू शकतात. जय शाह श्रीलंका ​​क्रिकेट बोर्ड चालवत आहेत. त्यांच्या दबावामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरबाद होत आहे.

- Advertisement -

जय शाहा त्याच्या वडिलांमुळे शक्तिशाली

अर्जुन रणतुंगा यांनी दावा केला की, भारतीय व्यक्ती माणूस श्रीलंकेचे क्रिकेट उद्ध्वस्त करत आहे. जय शाहा केवळ त्यांच्या वडिलांमुळे (अमित शाह) शक्तिशाली आहेत.

हेही वाचा – IND Vs NED: नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? रोहित शर्माने सांगितलं कारण…

श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील भारतासोबतच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे बोर्डाच्या सर्व सदस्यांना काढून टाकून नवीन समिती स्थापन केली होती, जी काही तासांतच आयसीसीने रद्द केली होती. कारण ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने काढून घेतले. आता 1996 चा विश्वविजेता श्रीलंकेचा संघ आयसीसीच्या पुढील आदेशापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही.

चॅम्पियन ट्रॉफीसाठीही श्रीलंकेचा संघ पात्र नाही

श्रीलंका संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे श्रीलंका संघ सध्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. या खराब कामगिरीचा श्रीलंका संघाला फटका बसला असून संघ 2025 मधील चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पात्र ठरलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -