घरताज्या घडामोडीतुमचे लवकरच वाईट दिवस सुरू होणार, जया बच्चन संतापल्या

तुमचे लवकरच वाईट दिवस सुरू होणार, जया बच्चन संतापल्या

Subscribe

राज्यसभेत सोमवारी केंद्र सरकारने आणलेल्या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयक २०२१ वर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. यादरम्यान संसदेत जोरदार गदारोळ झाला. सर्वप्रथम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. त्यानंतर खासदार जया बच्चन यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुमचे लवकरच वाईट दिवस सुरू होतील. असं म्हणत जया बच्चन भाजपवर संतापल्या आहेत.

जया बच्चन यांना नार्कोटिक ड्रग्ज अँण्ड सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयकावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, मला तुमचे आभार मानायचे नाहीत. कारण एके काळी तुम्ही या बाजूने ओरडत वेलमध्ये जात होतात. असं जया बच्चन म्हणाल्या.

- Advertisement -

राकेश सिन्हा यांनी जया बच्चन यांच्यावर संसदेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. जया बच्चन यांनी संसदेच्या अध्यक्षांना वैयक्तिकरित्या संबोधित केले आहे. यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. कोणत्याही सदस्याला अध्यक्षांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

जया बच्चन यांनी काय म्हटलंय ?

राज्यसभेत केंद्र सरकारने आणलेल्या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयक २०२१ वर सोमवारी राज्यसभेत चर्चा झाली. यावर जया बच्चन म्हणाल्या की, मला बोलण्याची संधी दिली. आम्ही मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करत नसून बीलच्या क्लॅरिकल एररवर चर्चा करत आहोत. नेमकं काय चाललंय?, बघा तुमचा स्वभाव आणि वृत्ती अशीच राहिली तर, तुमचे वाईट दिवस लवकरच येतील. असं जया बच्चन म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : Rafael Nadal : टेनिस स्टार राफेल नदालला कोरोनाची लागण, ट्विट करत दिली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -