Jaya Prada : चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांच्या चेन्नई (Chennai) येथील रायपेटा येथे असलेल्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधा याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने जया प्रदा यांच्यासह तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकाला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Jaya Prada Film actress former MP Jaya Prada sentenced to 6 months What is the matter)
चेन्नईच्या रायपेटा येथे जया प्रदा यांच्या मालकीचे चित्रपटगृह आहे. हे चित्रपटगृह राम कुमार आणि राजा बाबू चालवतात. चित्रपटगृहात काम करणाऱ्या कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अपयशी ठरल्यामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, कामगारांनी न्यायालयात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली.
हेही वाचा – CRPC Amendment Bill : बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची तर, मॉब लिंचिंगमध्ये फाशीची शिक्षा
जया प्रदा यांनी कामगारांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन देताना, याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. परंतु कामगार सरकारी विमा महामंडळाच्या वकिलांनी त्यांच्या याचिकेवर आक्षेप घेतला. यानंतर सुनावणी करताना न्यायाधीशांनी जया प्रदा आणि या प्रकरणाशी संबंधित इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितले आहे.
जया प्रदा यांची राजकीय कारकिर्द
जयाप्रदा यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला 1994 मध्ये तेलुगू देसम पक्षातून सुरूवात केली. जयाप्रदा 1996 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या. यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली आणि यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा – PM Modi Degree Case : केजरीवालांना दिलासा नाहीच; गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
जयाप्रदा रामपूरमधून दोनदा खासदार झाल्या
जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाच्या वतीने रामपूरचे लोकसभेत दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रामपूरची जागा जिंकली होती. यानंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. जया प्रदा यांनी 2014 मध्ये बिजनौरमधून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2019 मध्ये जयाप्रदा रामूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.