घर Assembly Battle 2022 बिहारमधील राजकीय समीकरणं बदणार? : मुख्यमंत्र्यांनी आज जेडीयूच्या आमदार- खासदारांची बोलवली बैठक

बिहारमधील राजकीय समीकरणं बदणार? : मुख्यमंत्र्यांनी आज जेडीयूच्या आमदार- खासदारांची बोलवली बैठक

Subscribe

बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयूमध्ये राजकीय वाद निर्माण झाला. ज्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा वाटपावरून सर्वप्रथम जेडीयू आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला. ज्यानंतर जेडीयू आणि भाजपमधील राजकीय वाद वाढत गेले. भाजपसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी 11 वाजता जेडीयूच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. जेडीयू पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन यांनी सोमवारी ही माहिती दिली. बिहारमधील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे.

हेही वाचा : जुगार खेळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतण्याला अटक, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

याआधी सोमवारी काँग्रेस पक्षाने बिहारमधील विकसनशील राजकीय चित्रावर विचार करण्यासाठी आपल्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केंद्राच्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी न झाल्याने आता जेडीयू आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. राजधानी पाटणामध्ये माध्यमांशी बोलताना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह म्हणाले की, “मी वर्तमानपत्रात वाचले की, आरसीपी सिंग यांनी म्हटले आहे की, त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, त्यांचे नाव मंत्री पदाच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा : नितीश कुमारांच्या पक्षाचा भाजपवर निशाणा, एनडीए आघाडीतील तणाव वाढला

- Advertisement -

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर शपथ घेतल्याचा दावा केला. पण हे एका गोष्टीची पुष्टी आहे, ज्याबद्दल आम्ही आरसीपी सिंगवर आरोप करत आहोत. आरसीपी सिंग हे स्वत:च्या मर्जीने मंत्री झाले आहेत, असा आमचा आरोप आहे. त्यांनी अमित शहा यांचे नाव काढून टाकले, यावर लालन सिंह यांनी शाह आमच्या पक्षाचे आहेत का? जेडीयूचा कोणता नेता मंत्री होणार हे भाजप ठरवू शकेल का? असा सवाल उपस्थित केले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यातच पक्षाने भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उत्तर मागितल्यानंतर आरसीपी सिंग यांनी पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. जेडीयूमध्ये सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे आरसीपी सिंह यांनी जेडीयूला राम राम केल्याचे बोलले जाते. यावेळी त्यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले.


पक्षनेतृत्वावरील नाराजीमुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -