Homeदेश-विदेशBJP : मणिपूरमध्ये भाजपा सरकारला पाठिंबा कायम; प्रदेशाध्यक्षाची जेडीयू पक्षातून हकालपट्टी

BJP : मणिपूरमध्ये भाजपा सरकारला पाठिंबा कायम; प्रदेशाध्यक्षाची जेडीयू पक्षातून हकालपट्टी

Subscribe

मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष के. विरेंद्र सिंह यांनी राज्यपालांना पत्र लिहून एनडीएमधील समर्थन काढून घेत असल्याचे सांगितले होते. मात्र मणिपूरमध्ये भाजपाला जनता दल (यूनाइटेड) ने दिलेले समर्थन मागे घेण्याचं वृत्त समोर येताच पक्षाकडून के. विरेंद्र सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (यूनाइटेड) ने आज (22 जानेवारी) मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष के. विरेंद्र सिंह यांनी राज्यपालांना पत्र लिहून एनडीएमधील समर्थन काढून घेत असल्याचे सांगितले होते. मणिपूरमध्ये अब्दुल नासिर हेच जेडीयूचे एकमात्र आमदार आहेत. त्यांना सभागृहात विरोधी सदस्य करावे, अशी मागणी के. विरेंद्र सिंह यांनी पत्रातून केली होती. मात्र मणिपूरमध्ये भाजपाला जनता दल (यूनाइटेड) ने दिलेले समर्थन मागे घेण्याचं वृत्त समोर येताच पक्षाकडून के. विरेंद्र सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (JDU party continues to support BJP government in Manipur)

पक्षाने जारी केलेल्या निवेदनात के. विरेंद्र सिंह यांनी पाठिंबा काढून घेण्याच्या दाव्यांचे वर्णन निराधार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पक्षाने मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सिंह यांना पदावरूनही काढून टाकले आहे. पक्षाने निवेदनात म्हटले आहे की, विरेंद्र सिंह यांनी केंद्रीय नेतृत्वाशी कोणतीही चर्चा न करता भाजपाला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचे पत्र लिहिले आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात येत आहे. आम्ही एनडीएसोबत आहोत आणि आमचा पक्ष यापुढेही मणिपूरच्या जनतेची सेवा करून राज्याच्या विकासात योगदान देत राहील, असं जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Maha Kumbh 2025 : महाकुंभात 100 हून अधिक भाविकांना लाभले जीवनदान, सुधा मूर्ती यांनीही केले कौतुक

भाजपाचा पाठिंबा काढून घेण्यात नितीशकुमारांचा हात नाही

दरम्यान, 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपाचे 37 आमदार आहेत आणि त्यांना नागा पीपल्स फ्रंटच्या पाच आमदारांचा आणि तीन अपक्ष आमदारांचा अतिरिक्त पाठिंबा आहे. तसेच जेडीयूच्या 6 पैकी 5 आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जेडीयूच्या आमदारांनी पाठिंबा काढून घेतला असता तरी भाजपा सरकारला काहीही फरक पडणार नव्हता. परंतु, आगामी बिहार निवडणूक आणि केंद्रात नितीशकुमारांचा टेकू असल्याने भाजपावर दबावाचं तंत्र वापरण्यासाठी मणिपूरमधून पाठिंबा काढून घेतला का? अशी चर्चा रंगली होती. मात्र आता मणिपूरमध्ये भाजपाला दिलेला पाठिंबा काढून घेण्यात नितीशकुमार यांचा हात नव्हता, हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा –  Financial Fraud : बँकेच्या नावावर फेक कॉल येतायत? काळजी करू नका, आरबीआयने केलीय उपाययोजना