JEE Advanced 2021: ३ जुलैला होणारी JEE advance परीक्षा पुढे ढकलली

JEE Advanced 2021 postponed: इंजीनिअरिंगची परीक्षा जेईई-एडव्हान्स परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय औद्योगिक संस्था, IIT खडगपूरने JEE एडव्हान्स २०२१ ची होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. ३ जुलै २०२१ रोजी ही JEE Advanced 2021 घेतली जाणार होती. मात्र कोरोना विषाणूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही परीक्षा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर नोटीस जारी

जेईई एडव्हान्सच्या अधिकृत वेबसाईटने परीक्षा पुढे ढकलल्यासंदर्भात एक नोटीस जाहीर केली आहे. या नोटीसनुसार, जेईई एडव्हान्स २०२१ ही परीक्षा ३ जुलै २०२१ (शनिवार) रोजी घेण्यात येणार होती. मात्र कोरोना महामारीची स्थिती पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. योग्य वेळी परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

जेईई एडव्हान्स २०२१ परीक्षेची नवी तारखी केव्हा जाहीर होणार ?

सध्या तरी जेईई एडव्हान्स परीक्षा पुढील निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे योग्यवेळी या परीक्षांची तारीख आणि वेळ जाहीर केला जाईल. या परीक्षांसाठी इच्छुक उमेदवारांना परीक्षांसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ते Jeeadv.ac.in वर जाऊन अधिकृत नोटीस पाहू शकतात.

२.५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान

जेईई मेन परीक्षा २०२१ क्वालिफाई होणारे विद्यार्थी जेईई एडव्हान्स २०२१ या परीक्षेला बसण्यास पात्र समजले जातात. दरवर्षी जवळपास टॉप २.५ लाखाहून अधिक विद्यार्थी जेईई मेन क्लालिफायर जेईई अॅडवांससाठी अर्ज दाखल करतात. प्रत्येक कॅटेगरीमधील रँक आणि मार्कवर लक्षात घेतल्यास विद्यार्थ्यांची संख्या अधिक असू शकते.

जेईई मेन परीक्षेनंतर एडव्हान्स परीक्षा केली स्थगित

जेईई मेन २०२१ ची एप्रिल-मे रोजी होणारी परीक्षा नुकतीच स्थगित करण्यात आली. यानंतर आता जेईई एडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए) ने एंट्रेस एग्जाम आयोजित करण्यास तयार नाही. यामध्ये नीट- यूजी २०२१ परीक्षांचाही समावेश आहे. या सर्व परीक्षांबाबत कोरोनास्थिती पाहून ऑगस्टमध्ये निर्णय घेतला जाईल. कोरोना संक्रमणामुळे सीबीएसईच्या १०वीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि आता मेडिकल आणि इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशात वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे पालक आणि विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते.