घरCORONA UPDATEJEE आणि NEET परीक्षांबद्दल अखेर निर्णय झाला!

JEE आणि NEET परीक्षांबद्दल अखेर निर्णय झाला!

Subscribe

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे गेल्या जवळपास दीड महिन्यापासून यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. कारण लॉकडाऊन संपला की पुढे वाढवल्याची घोषणा केली जात होती. जेईई (JEE Exams) आणि नीट (NEET Exams) या पुढच्या करिअरसाठी महत्त्वाच्या परीक्षांसाठी १२वी झालेल्या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे या परीक्षा अधांतरी राहिल्या होत्या. त्यांच्याबाबत निश्चित अशी माहिती किंवा निर्णय होत नव्हता. अखेर यासंदर्भातला निर्णय आला असून लाखो विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जेईईच्या मुख्य परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलै रोजी होणार असून आयआयटी जेईई अॅडव्हान्स परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहेत. त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्याशिवाय नीटच्या परीक्षा २६ जुलै रोजी होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे. त्याशिवाय, सीबीएससी बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या प्रलंबित असलेल्या परीक्षांबाबत देखील लवकरच निर्णय घेतला जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -