घरदेश-विदेश​JEE Main 2022 : जेईई मेन परीक्षेच्या तारखेत बदल; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया...

​JEE Main 2022 : जेईई मेन परीक्षेच्या तारखेत बदल; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा झाली सुरु

Subscribe

जेईई मेंस 2022 (JEE Main 2022) या परीक्षेसाठी अर्ज करण्यास विलंब झालेल्या विद्यार्थ्यांना आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन एॅप्लीकेशन फॉर्म पुन्हा सुरु केले आहेत. याअंतर्गत आता ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 18 एप्रिल ते 25 एप्रिल रात्री 9 वाजेपर्यंत आहे.

एनटीएद्वारे जेईई मेंस 2022 परीक्षेचा (JEE Mains 2022 ) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ऑप्शन देण्यात आला आहे.
विद्यार्थी NTA च्या अधिकृत साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरून एॅप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. एनटीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अर्ज फी जमा करण्याची तारीख 25 एप्रिल रोजी रात्री 11:50 पर्यंत राहील.

- Advertisement -

परीक्षेची तारीख बदलली

यासोबतच परीक्षेच्या तारखाही बदलण्यात आल्या आहेत. जेईई मुख्य सत्र 1 परीक्षेच्या तारखा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 आहेत. तर दुसरीकडे जेईई मेंस सत्र 2 ची परीक्षा 21 ते 30 जुलैदरम्यान होणार आहे. यापूर्वी जेईई मेन सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा 21, 24, 25 एप्रिल, 29 एप्रिल आणि 1 मे रोजी ठेवण्यात आल्या होत्या.

अधिक माहितीसाठी NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

अधिक तपशील आणि अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी NTA च्या www.nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या. JEE (मेन) – 2022 बाबत अधिक माहितीसाठी, विद्यार्थी 011- 40759000/011-69227700 वर संपर्क करु शकतात किंवा [email protected] वर ईमेल करू शकतात.

- Advertisement -

नॅशनल टेस्टिंग एजन्सी विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रवेश परीक्षांचे आयोजन करते. NTA द्वारे JEE परीक्षा देखील आयोजित केली जाते. इंजिनियरिंग कोर्स प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा घेतली जाते.


Angarki Chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थीचे शुभ मुहूर्त आणि पुजा विधीचे महत्त्व जाणून घ्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -