घरदेश-विदेशजेईई मेन 2022 चं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाऊनलोड

जेईई मेन 2022 चं अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाऊनलोड

Subscribe

एनटीएने जारी केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 2022 सत्र 2 हे 25 जुलै 2022 पासून देशभरातील सुमारे 500 शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर सुरु होणार आहे

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) Main 2022 च्या दुसऱ्या सत्रासाठी जवळपास 7 लाख उमेदवारांसाठी 21 जुलै रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी जेईई मेन्स सेशन 2 साठी रजिस्ट्रेशन केले आहे ते अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in, nta.ac.in वरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. jeemain.nta.nic.in अॅडमिट कार्ड 2022 लिंक सक्रिय करण्यात आली आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवरून उमेदवार ते डाउनलोड करू शकतात. NTA ही JEE Main अॅडमिट पोस्टाद्वारे पाठवणार नाही ते फक्त ऑनलाइन डाउनलोड करता येतील. JEE सेशन 2 चं अॅडमिट डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

एनटीएने जारी केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) – 2022 सत्र 2 हे 25 जुलै 2022 पासून देशभरातील सुमारे 500 शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर सुरु होणार आहे. हे 629778 उमेदवारांसाठी सुरू केली जाणार आहे, ज्यात भारताबाहेरील 17 शहरांचा समावेश असल्याचे एनटीएने म्हटले जाणार आहे.

- Advertisement -

JEE Main Admit Card 2022 : ‘या’ स्टेप फॉलो करून डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड

  1. Joint Entrance Examination चे अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.

2. वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला JEE Main Session 2 Admit Card (login) लिंक दिसेव त्यावर क्लिक करा.

3. आता आवश्यक डिटेल्स भरा आणि सबमिट करा.

- Advertisement -

4. सर्व डिटेल्स सबमिट करताच तुम्हाला अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

5. जेईई मेन अॅडमिट कार्ड 2022 सत्र 2 परीक्षेच्या दिवसासाठी सुरक्षित ठेवायचे आहे आणि त्यानंतरही जेईई मुख्य उत्तर की आणि निकाल 2022 तपासणे आवश्यक आहे.

6. JEE मुख्य सत्र 2 च्या परीक्षेच्या तारखा NTA ने सुधारित केल्या आहेत. 21 जुलै 2022 ऐवजी, JEE 25 जुलै 2022 पासून सुरू होईल आणि 30 जुलै 2022 पर्यंत चालेल. परीक्षेचे शहर, ठिकाण, वेळ आणि इतर तपशील जेईई मेन अॅडमिट कार्ड 2022 वर दिले जातील.

जेईई मुख्य सत्र 2 अॅडमिट कार्ड 2022 डाउनलोड करण्यासाठी लिंक 

https://examinationservices.nic.in/jeemain22/downloadadmitcard/LoginDOB….


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -