Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश जेईई-मेन परीक्षेला स्थगिती

जेईई-मेन परीक्षेला स्थगिती

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची घोषणा

Related Story

- Advertisement -

देशातील वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जेईई (मेन) मे 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाला निशंक यांनी ही घोषणा केली. कोरोनाची सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील माहितीसाठी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला दिला आहे. . ही परीक्षा २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत होणार होती. दरम्यान, जेईई एप्रिल सत्र परीक्षाही यापूर्वी स्थगित करण्यात आली आहे.

केवळ फेब्रुवारी आणि मार्च सत्राच्या परीक्षा झाल्या आहेत. . ‘NTA Abhyas App’च्या माध्यमातून घरबसल्या मॉक टेस्टचा सराव करता येणार आहे. याचबरोबर या परीक्षेच्या अधिक माहितीसाठ nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर भेट द्यावी. जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विद्यार्थ्यांनी ०११-४०७५९००० वर किंवा [email protected] वर ईमेल द्वारे संपर्क साधण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

- Advertisement -

यापूर्वी सोमवारी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पीजी परीक्षा परीक्षा ढकलण्याचा निर्णय घेतला होता. नीट-पीजी किमान 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि परीक्षा 31 ऑगस्ट 2021 पूर्वी घेण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्यापूर्वी किमान एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल. यामुळे कोविड कर्तव्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध होतील.

सीएच्या तीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीएची परीक्षाही पुढे ढकण्यात आल्यानंतर आता इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने सीएच्या फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल या तीन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा १ ते १० जून या कालावधीत पार पडणार होत्या. या परीक्षांची सुधारित तारीख येत्या काळातील आरोग्य स्थिती घेऊन जाहीर करण्यात येईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -