घरताज्या घडामोडीJEE Main May 2021: जेईई मेन परीक्षा स्थगित, तिसऱ्या व चौथ्या सत्रासाठी...

JEE Main May 2021: जेईई मेन परीक्षा स्थगित, तिसऱ्या व चौथ्या सत्रासाठी पुन्हा वेळापत्रक काढणार

Subscribe

पहिल्या दोन सत्रातील परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आली आहे. तर तिसऱ्या सत्रातील एप्रिल आणि चौथ्या सत्रातील मे मध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे देशात लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता आयसीएसई आणि अन्य बोर्डाच्या परीक्षा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच आता मे महिन्यात होणारी जेईई मेन परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जेईई मेन २०२१ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जेईई मेन २०२१ मे मध्ये होणाऱ्या परीक्षा सत्राला पुढे ढकलले ही परीक्षा मे २४,२५,२६,२७ आणि २८ मे रोजी घेण्यात येणार होती. जेईई मेन २०२१ परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेतस्थळाला भेट देत राहावे असे ट्विट केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे.

- Advertisement -

यापूर्वी एनटीएने एप्रिल महिन्याच्या २७ ते ३० एप्रिलला होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर आता जेईई मेन २०२१ परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा पुन्हा नव्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. यावर्षी जेईई कोर परीक्षा चार सत्रांत आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या दोन सत्रातील परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आली आहे. तर तिसऱ्या सत्रातील एप्रिल आणि चौथ्या सत्रातील मे मध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -