घरताज्या घडामोडीJEE Main 2021: तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातील परीक्षेची तारीख ठरली

JEE Main 2021: तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातील परीक्षेची तारीख ठरली

Subscribe

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियल निशंक यांनी आज, मंगळवारी एक लाईव्ह संबोधना दरम्यान जेईई मेन-२०२१ (JEE Main 2021)च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षेची तारीख घोषित केली आहे. शिवाय यासंबंधी एनटीएद्वारे अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. याबाबतची माहिती ट्विट करून स्वतः डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी दिली आहे.

पुढे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले की, ‘कोरोना दरम्यान जेईई मेन -२०२१ परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की, आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्य शिक्षण मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मी एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजेंसीच्या महासंचालकांना जेईई मेन-२०२१च्या परीक्षांच्या संदर्भात पुढील व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’

- Advertisement -

 

- Advertisement -

केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी सांगितले की, ‘तिसऱ्या टप्प्यातील जेईई परीक्षा २० जुलै २०२१ पासून ते २५ जुलै २०२१ पर्यंत होईल. यासाठी ६ जुलै २०२१ पासून ते ८ जुलै २०२१च्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा अर्ज आणि परीक्षा केंद्र बदलण्याचे अर्ज स्वीकारले जातील. तर चौथ्या टप्प्यातील जेईई मेन परीक्षा २७ जुलै २०२१ पासून ते २ ऑगस्ट २०२१ पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील परीक्षा केंद्राचा पुन्हा अर्ज आणि बदल करण्याचा अर्ज ९ जुलै २०२१ पासून १२ जुलै २०२१च्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारले जातील.’


हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळात २० नवीन चेहरे, महाराष्ट्र, यूपी आणि बिहारला प्राधान्य


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -