घरदेश-विदेशJammu Kashmir : गेल्या 12 तासात सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा;...

Jammu Kashmir : गेल्या 12 तासात सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा केला खात्मा; जैशच्या कमांडरचाही समावेश

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) गेल्या 12 तासात सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. काश्मीरच्या आयजीपींनी सुरक्षा दलाचे हे मोठे यश असल्याचे वर्णन केले आहे.

जम्मू आणि काश्मीर डीजीपी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री बडगाम जिल्ह्यातील चरारेश्रीफ आणि पुलवामा जिल्ह्यातील नायरा येथे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. यादरम्यान बडगाममध्ये एक आणि पुलवामामध्ये चार दहशतवादी मारले गेले आहेत.

- Advertisement -

जाहिद मंजूर वानी हा जम्मू-काश्मीरमधील जैशच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी ज्या लेतपुरा घटनेत 40 हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते त्या घटनेच्या कटात जाहिदचा सहभाग होता. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

कुलगाम जिल्ह्यात एका पोलिसाच्या हत्येनंतर आता पुलवामाच्या नायरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मोठ्या संख्येने लष्करी जवान, पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला आहे.

तर दुसरीकडे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा येथे काही संशयित दहशतवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद गनी यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुलगाम पोलीस ठाण्यात ते तैनात होते.

दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. तर सर्व परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली जात आहे. यात प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. यासोबतच दहशतवाद्यांच्या धाडसालाही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -