DGCA allows Jet Airways : जेट एअरवेज लवकरच घेणार उड्डाण; अखेर डीजीसीएने दिली परवानगी

जेट एअरवेज कंपनी ही मागील तीन वर्षांपासून कर्जाच्या ओझ्यामुळे बंद होती. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मागील बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न केले जात होते. शिवाय, कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतली.

मागील तीन वर्षांपासून बंद असलेली जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीची विमाने आता पुन्हा एकदा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) परवानी दिली आहे. या कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान (murari lal jalan) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली.

जेट एअरवेजचे नवे मालक यांनी मुलाखतीवेळी “ही बातमी फक्त जेट एअरवेजसाठीच नाही तर, संपूर्ण भारतीय विमानसेवेसाठी मोठी गोष्ट आहे. विमान प्रवाशांसाठी आम्ही पुन्हा सेवा सुरू करत आहोत. शिवाय नवनवीन सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करू, सर्व प्रवाशांच्या अपेक्षा पुर्ण करू”, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच जेट एअरवेजची विमानसेवा सुरू होणार आहे.

हेही वाचा – जेट एअरवेजमध्ये कोट्यवधींची अफरातफर

जेट एअरवेज कंपनी ही मागील तीन वर्षांपासून कर्जाच्या ओझ्यामुळे बंद होती. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मागील बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न केले जात होते. शिवाय, कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतली. त्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत.

विमानसेवा सुरू होण्यापूर्वी सराव फेऱ्या

जेट एअरवेज कंपनीची विमानसेवा सुरू होण्यापूर्वी सराव फेऱ्या सुरू आहेत. 15 आणि 17 मे रोजी प्रोव्हाईडिंग फ्लाईट्सही कंपनीकडून उडवण्यात आल्या. ज्यात हवाई वाहतूक संचालनालयाचे अधिकारी होते. त्यांच्या पर्यवेक्षणानंतर आता एअर ऑपरेटर सर्टीफिकेट (Air Operator Certificate) कंपनीला देण्यात आलं आहे.

17 एप्रिल 2019 रोजी कंपनी बंद

आर्थिक कर्जाच्या ओझ्याखाली आल्यामुळे 17 एप्रिल 2019 रोजी जेट एअरवेज कंपनी (Jet Airways) बंद करण्यात आली. त्याआधी जेट एअरवेज कंपनीला दक्षिण आशियातील ‘सर्वात मोठी खाजही विमान कंपनी’ असा दर्जा देण्यात आला होता.

नरेश गोयल यांनी सुरू केली जेट एअरवेज

1990 दशकाच्या सुरुवातीला जेट एअरवेज कंपनीची सुरुवात करण्यात आली. तिकीट एजंट-उद्योजक नरेश गोयल (Naresh Goyal) यांनी ही कंपनी सुरू केली होती. जेट एअरवेजकडे एकेकाळी एकूण १२० विमाने होती. ‘द जॉय ऑफ फ्लाइंग’ या टॅग लाइनसह ही काम करत होती. शिवाय, दिवसाला 650 उड्डाणे करत होती. कंपनी बंद झाली तेव्हा तिच्याकडे फक्त 16 विमाने उरली होती. मार्च 2019 पर्यंत कंपनीचा तोटा 5,535.75 कोटी रुपये होता.


हेही वाचा – नवज्योत सिंग सिद्धू यांची पटियाला न्यायालयात शरणागती