Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी jet airways : कर्मचाऱ्यांची ८५ लाख पर्यंत रक्कम थकीत परंतु २३ हजार...

jet airways : कर्मचाऱ्यांची ८५ लाख पर्यंत रक्कम थकीत परंतु २३ हजार रुपये देण्याची योजना

जेट एअरवेजवर १५ हजार ४०० करोडचे कर्ज

Related Story

- Advertisement -

विमान कंपनी जेट एअरवेजवर कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे ३ ते ८५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम थकी आहे. जेट एअरवेजचे नवे मालक कलरॉक-जालान या नवीन मालकांनी सादर केलेल्या पुनरुज्जीवन योयजनेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला सुमारे २३ हजार रुपये देण्याचे प्रस्तावित केलं आहे. जेट स्टाफसाठी ही रक्कम फार कमी आहे. दरम्यान, ऑल इंडीया जेटएअरवेज स्टाफ अँड असोसिएशनचे अध्यक्ष किरण पावसकर उ्दया १५ जुलै रोजी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कोरोनाकाळ असल्याने ८० पैकी ४० कर्मचाऱ्यांच्या एक बॅच अशा दोन बॅचमध्ये हे चर्चासत्र घेण्यात येणार आहे.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने नुकतीच जेट एअरवेजच्या ठरावाची योजना मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत असे ठरविण्यात आले आहे. जेट एअरवेजच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी येत्या तीन महिन्यांत रिझोल्यूशन योजनेसाठी संमती दिली तर त्यांना मोबदला दिला जाईल. एनसीएलटीच्या आदेशात ग्रॅच्युइटीसारख्या वैधानिक थकबाकीबाबत काहीही सांगण्यात आले नाही. तसेच कार्मचाऱ्यांच्या उर्वरित थकबाकीबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

- Advertisement -

ऑल इंडिया जेट एअरवेजचे अधिकारी आणि कार्मचारी संघाचे प्रमुख किरन पावस्कर यांनी म्हटलं आहे की, जेट एअरवेजच्या योजनेवर कर्मचाऱ्यांचं उत्तर होकार आणि नकार मध्ये करण्यात येणार आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना केवळ त्यांच्या थकबाकीच्या ०.५ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. ही योजनेत कर्मचाऱ्यांना काहीही न मिळाल्यासारखे आहे. यामुळे जर प्रकरण मार्गी लागले नाही तर न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. याबाबत असोसिएशनने नागरी उड्डाण मंत्री, कामगार मंत्री आणि प्रादेशिक कामगार आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

जेट एअरवेजवर १५ हजार ४०० करोडचे कर्ज

जेट एअरवेजवर कर्जदारांचे १५ हजार ४०० करोड रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये कर्मचारी, कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ मिळवून १२५४ करोज रुपयांची थकीत रक्कम आहे. जेटच्या एका कर्मचाऱ्याच्या माहितीनुसार कंपनीतील प्रत्येक कमांडरचे ८५ लाख रुपये तर कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आहे. नव्या योजनेअंतर्गत मालक कर्मचाऱ्यांना पगार देऊ इच्छितो आहे. यामध्ये ११००० रुपये रोख आणि ५ हजार १०० कर्मचाऱ्यांच्या आई वडिलांचा आरोग्य विमा काढण्याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ६ हजार २०० रुपये आणि ५०० रुपयांचे मोबाईल रिचार्जचा प्लान सादर करण्यात आला आहे.

- Advertisement -