घरक्राइमसामूहिक बलात्काराप्रकरणी 8 विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा; झाशी न्यायालयाचा निर्णय

सामूहिक बलात्काराप्रकरणी 8 विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा; झाशी न्यायालयाचा निर्णय

Subscribe

न्यायालयाने प्रत्येक दोषीला 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील निम्मी रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. विशेष सरकारी वकील विजय कुमार कुशवाह या प्रकरणाची सुरुवातीपासूनच चौकशी करत आहेत.

एका पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 8 विद्यार्थ्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. झाशी न्यायालयाने विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (jhansi Court Government Polytechnic Students Life Imprisonment Gangrape Pocso)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 8 विद्यार्थी हे सर्व शासकीय पॉलिटेक्निकमध्ये शिकत असून, त्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांच्या वसतिगृहासमोरून जाणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी झाशी न्यायालयाने या मुलांना दंडही ठोठावला आहे.

- Advertisement -

न्यायालयाने प्रत्येक दोषीला 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील निम्मी रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. विशेष सरकारी वकील विजय कुमार कुशवाह या प्रकरणाची सुरुवातीपासूनच चौकशी करत आहेत. आठही आरोपी या गुन्ह्यात दोषी आढळले आहेत. या सर्वांवर POCSO कायद्याच्या कलम 5/6, 9/10 सह 11 कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.

या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये महोबाचा मुख्य आरोपी रोहित सैनी, भारत कुमार, संजय कुशवाह, धर्मेंद्र सेन, मोनू पर्या आणि झांशीचे मयंक शिवहरे, गोंडाचे शैलेंद्र नाथ पाठक व प्रयागराजचा विपिन तिवारी यांचा समावेश आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दसरा मेळाव्यांसाठी गर्दी जमवण्याकरीता दोन्ही गटांकडून हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -