Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक! झारखंडमध्ये मुलीला जिवंत जाळले; आरोपीला अटक

धक्कादायक! झारखंडमध्ये मुलीला जिवंत जाळले; आरोपीला अटक

Subscribe

झारखंडमधील दुमका येथे एका मुलीला पेट्रोल ओतून जाळल्याची घटना समोर आली आहे. एका विवाहित तरुणाला बळजबरीने तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

झारखंडमधील दुमका येथे एका मुलीला पेट्रोल ओतून जाळल्याची घटना समोर आली आहे. एका विवाहित तरुणाला बळजबरीने तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्याने तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Jharkhand A girl was set ablaze in Dumka accused arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय मारूती कुमारी या मुलीला आरोपी राजेश राऊत याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारूती कुमारी ही तिच्या आजीसोबत झोपली होती. त्यावेळी लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात राजेशने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या अपघातात मारुती 70 टक्के भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली. जारमुंडी ब्लॉकमधील भालकी गावात ही घटना घडली.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी राजेश राऊतला अटक केली. तसेच, याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मुलीला गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचारासाठी रांचीला पाठवण्यात आले असल्याची माहिती जारमुंडीचे डीएसपी शिवेंद्र यांनी दिली.

अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर तिला रांचीला पाठवण्यात आले. राजेश राऊतने घरात घुसून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे मुलीने निवेदनात म्हटले आहे. त्याला तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे.

- Advertisement -

“आरोपी राजेश राऊत हा पाकूर जिल्ह्यातील महेशपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रामगढचा रहिवासी आहे. त्याच वर्षी राजेश राऊतचे दुसऱ्या मुलीशी लग्न झाले होते. यानंतरही तो जखमी तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता”, असे डीएसपी शिवेंद्र यांनी सांगितले.

मारुती कुमारी भालकी गावात मामाच्या घरी राहत असून, सध्या पदवीची तयारी करत होती. 2021 मध्ये तिची आरोपी राजेशशी भेट झाली. त्यानंतर त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मुलीचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. याचाच राग आल्याने त्यांने तिला पेट्रोल टाकून पेटवले.


हेही वाचा – अमेरिकेत 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची हत्या, कोरियन रुममेटला अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -