घरदेश-विदेशHemant Soren : झारखंडच्या CM ना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; राजभवनात...

Hemant Soren : झारखंडच्या CM ना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; राजभवनात हालचालींना वेग

Subscribe

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडचणीत आले आहेत. सोमवारी सकाळी 7 वाजता ईडीने दिल्लीतील शांती निकेतनमधील हेमंत सोरेन यांच्या घरासह 3 ठिकाणी छापे टाकले आणि रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. ईडीच्या टीमला मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी सापडले नाहीत. मात्र, काल मंगळवारी (ता. 30 जानेवारी) 40 तासांनंतर हेमंत सोरेन हे समोर आले. त्यानंतर सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे आता मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Jharkhand CM Hemant Soren likely to be arrested at any moment; Speed ​​of movement in Raj Bhavan)

हेही वाचा… Rahul Gandhi : ‘तुम्ही लग्न कधी करणार?’ 6 वर्षाच्या मुलाने राहुल गांधींना विचारला प्रश्न; असे मिळाले उत्तर…

- Advertisement -

मनी लाँड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने आता हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानावरील आणि राजभवानाच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण झारखंड शहरात तब्बल 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जमीन घोटाळा प्रकरणात गेल्या सहा तासांपासून ईडीकडून सोरेन यांची चौकशी केली जात आहे. झारखंडमधील वाढत्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना राजभवनात भेटण्याची वेळ देण्यात आली आहे. झामुमोचे आमदार काही वेळाने राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात सोरेन यांन आजच अटक करण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी हेमंत सोरेन 27 जानेवारी रोजी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले. तसेच दिल्लीत काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर भाजपाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. तसेच इंस्टाग्रामवर हेमंत सोरेन यांच्या फोटोसह एक पोस्टर शेअर केले होते. त्यात लिहिले की, ‘नाव- हेमंत सोरेन. गडद रंग, उंची 5 फूट 2 इंच, कपडे- पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि पायात चप्पल. 29 जानेवारी रात्री 2 वाजल्यापासून म्हणजे गेल्या 40 तासांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांना रात्री 2 वाजता पायी बाहेर पडताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शेवटचे पाहिले होते. ज्या मान्यवरांना याबाबत माहिती मिळेल त्यांनी त्वरित दिलेल्या पत्त्यावर कळवावे. माहिती देणाऱ्यास 11 हजार रुपये रोख दिले जाईल, अशी घोषणा भाजपाने केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -