घरदेश-विदेशJharkhand: हेमंत सोरेन यांची पत्नी होणार मुख्यमंत्री? झारखंडमध्ये खलबतं

Jharkhand: हेमंत सोरेन यांची पत्नी होणार मुख्यमंत्री? झारखंडमध्ये खलबतं

Subscribe

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या झारखंडच्या मुख्यमंत्री होणार

रांची: दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाला (ED) छाप्यापूर्वी चकमा देणारे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन रांचीला पोहोचले आहेत. सुमारे 40 तास ‘बेपत्ता’ असलेले हेमंत सोरेन मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास बाहेर आले. अचानक त्यांचा ताफा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ दिसला. चेहऱ्यावर हास्य आणि हात हलवत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश करत सोरेन लगेचच कामाला लागले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेल्या आमदारांसोबत त्यांनी पुढील वाटचालीवर विचारमंथन सुरू केले. (Jharkhand Hemant Soren s wife Kalpana Soren to become Chief Minister political Crisis in Jharkhand)

सर्किट हाऊसमध्ये जमल्यानंतर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पनाही आमदारांच्या बैठकीत दिसल्या. तेव्हापासून कल्पना यांना मुख्यमंत्री बनवलं जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. ईडीची भूमिका लक्षात घेता जेएमएमला 31 जानेवारीला चौकशीदरम्यान सोरेनला अटक होण्याची भीती आहे. हेमंत सोरेन हे ईडीसमोर हजेर होण्यापूर्वी प्लॅन ‘बी’ तयार करत असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

अलीकडेच आमदार सरफराज अहमद यांनी गांडे मतदारसंघातून राजीनामा दिला होता. कल्पना सोरेनला मुख्यमंत्री करण्यासाठी झामुमोने ही जागा सोडल्याचा दावा भाजपने केला होता. कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवल्यास त्या गांडे मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. मात्र, हेमंत सोरेन यांनीच या शक्यतांना नकार देत ही भाजपची कल्पना असल्याचे म्हटले आहे.

हेमंत सोरेन यांना अटकेची भीती?

कथित जमीन घोटाळ्यात सहभागी असलेल्या हेमंत सोरेन यांना अटक होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सोरेन यांनी ईडीला सांगितले आहे. दरम्यान, सोमवारी दिल्लीत टाकलेल्या छाप्याबाबत ईडीने दावा केला आहे की, सोरेनच्या घरातून 36 लाख रुपये रोख आणि एक आलिशान कार जप्त करण्यात आली आहे. प्रस्तावित चौकशीपूर्वीच ईडी सोरेन यांच्यावर कारवाई करू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: Prakash Ambedkar : महाविकास आघाडीच्या 50% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार; प्रकाश आंबेडकरांचे भाकित )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -