घरक्राइम'कलम 498 अ'च्या गैरवापराबद्दल झारखंड हायकोर्टाला चिंता; ढाल नव्हे तर, शस्त्र म्हणून...

‘कलम 498 अ’च्या गैरवापराबद्दल झारखंड हायकोर्टाला चिंता; ढाल नव्हे तर, शस्त्र म्हणून वापर

Subscribe

नवी दिल्ली : भादंविच्या (IPC) कलम 498 अ च्या गैरवापराबद्दल झारखंड उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या कायद्यातील तरतुदींचा ‘असंतुष्ट पत्नींकडून’ ढाल म्हणून वापर न करता केवळ शस्त्र म्हणून दुरुपयोग केला जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नुकतेच नोंदवले आहे. योग्य सल्लामसलत न करता केवळ आवेशात येऊन किरकोळ मुद्द्यांवर महिलांकडून असे खटले दाखल केले जात असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.

हेही वाचा – तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं असतं तर…; मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंचे सूचक विधान

- Advertisement -

सासरच्या मंडळींकडून विवाहित महिलेचा छळ होत असेल तर, ‘498 अ’ कलमान्वये तिला त्यापासून संरक्षण मिळविता येते. यासंदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती संजय कुमार द्विवेदी यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून महिलेला क्रूर वागणूक मिळाल्यास, त्यांना शिक्षा देण्याच्या सद्हेतूने भादंविचे (IPC) कलम 498 अ कायद्यात समाविष्ट केले गेले. तथापि, अलिकडच्या वर्षांत वैवाहिक वादांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याचे चित्र आहे. भादंविच्या कलम 498 अ चा अनेक प्रकरणांमध्ये गैरवापर होत आहे, असे वाटत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

लहान-मोठे वैवाहिक संघर्ष अचानक सुरू होतात आणि अनेकदा ते गंभीर होतात. ते इतके वाढतात की, त्याची परिणती एखाद्याच्या मृत्यूही होते. हे इतके गंभीर गुन्हे होतात की, ज्यात कुटुंबातील वडीलधाऱ्यांना महिलांकडून खोटे गुंतवले जाते, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणात तक्रारदार महिलेने आपली नणंद आणि मेव्हण्याने अत्याचार केल्याबद्दल सुरू केलेली फौजदारी कारवाई रद्द करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली.

- Advertisement -

हेही वाचा – सीमेवरील घुसखोरी आणि तस्करीला आता मधमाशांचा डंख; बीएसएफचा अनोखा प्रयोग

काय होते प्रकरण?
याचिकादाराने आपल्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते आणि त्यात तथ्यही आढळले. कारण कथित घटनेच्या दिवशी (ज्यावेळी अत्याचार केल्याचा आरोप होता) ते ट्रेनमधून प्रवास करत होते. ही वस्तुस्थितीच याचिकाकर्त्याविरुद्ध नोंदवलेली तक्रार खोटी असल्याचे सिद्ध करणारी होती. खटल्यातील तथ्य आणि याचिकाकर्त्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ते हैदराबादमध्ये राहतात, तर कथित घटनेचे ठिकाण धनबादमध्ये आहे आणि घटनेच्या कथित तारखेला याचिकाकर्ते एका ट्रेनमधून प्रवास करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -