Homeदेश-विदेशJharkhand : मिंध्या आमदारांनी 'त्यांच्या' पायांचे तीर्थ प्राशन केले पाहिजे, ठाकरे गटाचा...

Jharkhand : मिंध्या आमदारांनी ‘त्यांच्या’ पायांचे तीर्थ प्राशन केले पाहिजे, ठाकरे गटाचा टोला

Subscribe

मुंबई : झारखंडमध्ये बहुमत असतानाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आधी चंपई सोरेन यांना चार दिवस मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली नाही. या चार दिवसांत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या आमदारांना गळाला लावता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटले, पण झारखंडचा बाणेदार आदिवासी मोदी-शहा यांच्या झुंडशाहीपुढे झुकला नाही. महाराष्ट्रातील 40 + 40 मिंध्या आमदारांनी या आदिवासी आमदारांच्या पायांचे तीर्थ प्राशन केले पाहिजे. सोरेन यांच्या आघाडीतील आमदारांनी इमान विकले नाही आणि मोदी-शहा यांच्या भ्रष्ट राजकारणाला झारखंडच्या आदिवासी भूमीवर थारा दिला नाही. ही घटना ऐतिहासिक आहे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – Rane On Uddhav Thackeray : “भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू”, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

सध्याच्या राजकीय वातावरणात सगळेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ ‘मिंधे’ नसतात. काही झारखंडचे स्वाभिमानी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनसुद्धा असतात. याची प्रचीती एव्हाना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आली असेल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

फक्त सात एकर जमिनीच्या व्यवहारांत मोदी-शहा यांनी ‘ईडी’च्या माध्यमातून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनातच अटक करायला लावली. सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमधील सरकार कोसळले. सोरेन यांच्या पक्षाच्या आमदारांत फाटाफूट होईल, ‘ईडी’च्या दबावाखाली आमदार पक्षांतर करतील व भाजपाचे मनसुबे पूर्ण होतील, अशी भाजपाची अपेक्षा होती, पण यापैकी काहीच घडले नाही आणि हेमंत सोरेन यांचे उत्तराधिकारी चंपई सोरेन यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 47 आमदारांनी मतदान केले, तर विरोधात 29 आमदार, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘मोदी माझे शत्रू नाहीत’ म्हटल्या नंतर उद्धव ठाकरेंचा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास

अटकेत असलेल्या हेमंत सोरेन यांना विधानसभेतील मतदानासाठी सभागृहात येण्याची परवानगी दिली व ते आले. त्यांनी जोरदार भाषण करून मोदी-शहा यांच्या सूडाच्या राजकारणाला आव्हान दिले. सोरेन काय म्हणाले ते समजून घेतले पाहिजे. ‘आपल्यावरील सर्व आरोप ‘बेबुनियाद’ आहेत. कोणत्या तरी सात एकरांच्या जमीन व्यवहाराचा आरोप ठेवून आपल्याला अटक केली. या जमिनीचे कागद ईडीने समोर आणावेत. जनतेसमोर आणावेत. मी राजकीय संन्यास घेईन. इतकेच नव्हे तर, झारखंड सोडून कायमचा निघून जाईन.’ असे आव्हान हेमंत सोरेन देऊ शकतात ते त्यांचे नाणे खणखणीत असल्यामुळेच, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

सोरेन यांचे अटकेचे प्रकरण राजकीय दहशतवाद व दडपशाहीचे भयंकर प्रकरण आहे. एखाद्या राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे खोटय़ा प्रकरणात अटक करून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयोग लोकशाहीला अमान्य आहे, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – Aastha Train: रामलल्ला दर्शन स्पेशल; भाजपची मुंबईतून अयोध्येसाठी पहिली ट्रेन रवाना