घरटेक-वेकजिओचा नवा धमाका; 'या' प्लॅनमध्ये मिळणार 1076 GB डेटा

जिओचा नवा धमाका; ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार 1076 GB डेटा

Subscribe

जिओने ग्राहकांकरता नवीन ऑफर आणली असून या प्लॅनमध्ये 1076 GB डेटा वापरता येणार आहे.

रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणत असतात. यामध्ये वेगवेगळे प्लॅनस देखील दिले जातात. ज्याचा युजर्सना अधिक फायदा होतो. या प्लॅनमध्ये अधिक प्रमाणात डेटा आणि कॉलिंगची सुविधा असते. मात्र, आता याव्यतिरिक्त एक खास ऑफर्स जिओच्या युजर्सकरता आणली गेली आहे. ज्याचे नाव आहे जियो लिंक. यामध्ये युजर्सना मोठ्या प्रमाणात डेटा मिळणार आहे. ज्यामुळे घरी बसून काम करणाऱ्या नागरिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. चला तर जाणून घेऊया या ऑफरविषयी…

काय आहे जिओ लिंक?

- Advertisement -

जिओ लिंक एक 4G मॉडम असून हा नेटवर्कचा स्पीड वाढवण्यास मदत करतो. मात्र, हे हॉटस्पॉट आणि वायफायपेक्षा वेगळे असून यामध्ये फक्त डेटा उपलब्ध आहे. ही ऑफर सर्वप्रथम जिओच्या कर्मचाऱ्यांकरताच उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, 4G नेटवर्कचे लॉचिंग झाल्यानंतर याचा वापर कमी करण्यात आला. मात्र, जर आता जिओच्या युजर्सकडे जिओ लिंक मॉडम असेल तर तुम्ही रिचार्ज करुन हायस्पीड इंटरनेटचा नक्की वापर करु शकता.

जिओ लिंकचा ६९९ रुपयाचा प्लॅन

जिओच्या ६९९ च्या प्लॅनमध्ये 156 GB डेटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. तसेच हा पॅक तुम्ही २८ दिवस वापरु शकता.

- Advertisement -

२ हजार ०९९ रुपयाचा प्लॅन

जिओच्या २ हजार ९९ रुपयाच्या पॅकमध्ये 538 GB डेटा देण्यात आला आहे. मात्र, या प्लॅनमध्ये देखील कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. तसेच हा पॅक तुम्ही ९८ दिवस वापरु शकता.

४ हजार १९९ रुपयाचा पॅक

जिओ लिंकचा हा प्लॅन ४ हजार १९९ रुपयाचा असून यामध्ये 1076GB डेटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा डेटा तुम्ही १९६ दिवस वापरु शकता.


हेही वाचा – Coronavirus: पत्रकारांनो स्वतःची बातमी बनणार नाही, याची काळजी घ्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -