घरटेक-वेकJio ची देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेची सेवा, SES सोबत भागीदारीची घोषणा

Jio ची देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेची सेवा, SES सोबत भागीदारीची घोषणा

Subscribe

जिओ आणि SES यांच्यात प्रत्येकी ५१ आणि ४९ टक्के इक्विटी भागीदारी असणार आहे.

मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म आणि जगातील उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटी देणारी SES या कंपनीने Jio Space Technology Limited नामक एका संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. या नव्या उपक्रमामुळे देशभरातील सॅटलाईट बेस्ड टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन ब्रॉडबँड सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी जॉइंट वेंचर मल्टी ऑर्बिट स्पेस नेटवर्कचा उपयोग करण्यात येणार आहे. जिओ आणि SES यांच्यात प्रत्येकी ५१ आणि ४९ टक्के इक्विटी भागीदारी असणार आहे.

या नेटवर्कमध्ये जिओस्टेशनरी आणि मीडियम अर्थ ऑर्बट सॅटलाईट्सचा उपयोग केला जाणार आहे. नेटवर्कच्या माध्यमातून मल्टी गीगाबाइट लिंकने भारताच्या शेजारील देशांमध्ये बिझनेस, मोबाईल आणि किरकोळ ग्राहकही सहभागी होऊ शकतात. SES जिओला १०० GBPS स्पीड इंटरनेट उपलब्ध करुन देणार आहे ज्याचा उपयोग जिओ त्यांच्या मजबूत नेटवर्कसाठी करणार आहे.

- Advertisement -

या नव्या उपक्रमात SESने आपले मॉर्डन सॅटलाईट देणार आहे. तर जिओ गेटवे इन्फ्रास्टक्चरचे ऑपरेटिंग आणि व्यवस्थापन करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, नव्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भागीदारीसाठी ब्रॉडबँडपर्यंत पोहोचणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कोरोनाने शिकवले.

आम्ही आपली फायबर आधारित कनेक्टिव्हिटी आणि एफटीटीएच बिझनेससह ५ उपक्रम जाहीर करणार आहे. तर दुसरीकडे SESसह नवीन वेंचर मल्टीगीगाबाइट ब्रॉडबँडचा विकास आणखी जलद गतीने होईल. सॅटेलाईट कम्युनिकेशन सेवांद्वारे दिलेल्या जाणाऱ्या अतिरिक्त कव्हरेज आणि क्षमतेने जिओ नेटवर्क देशातील अती दुर्गम भागात, शहरात, गावात तसेच जिथे सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नाही तिथे पोहचला येईल आणि यामुळे नवीन ग्राहक डिजिटल इंडियाशी जोडले जातील, असे जिओच्या आकाश अंबानी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे जिओ सोबत या उपक्रमात उच्च दर्जाची कनेक्टिव्हिटी देऊन लाखो लोकांच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल करुन SES ही कंपनी लाखो लोकांपर्यत पोहोचू शकते. त्याचप्रमाणे ऑन ग्राउंड नेटवर्क कसे पूरक ठरू शकते हे देखील यातून दिसून येईल त्यामुळे जिओ सोबत आम्ही केलेल्या भागीदारीत काम करण्यासाठी  उत्साही आहोत, असे SESचे सीईओ स्टीव कॉलर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Chinese Apps Ban: मोदी सरकारने दिला चीनला झटका! ५४ चीनी ॲप्सवर घातली…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -