Jio चा मोठा धमाका : वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज अन् दररोज 2.5GB डेटा फ्री

टेलीकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या युजर्ससाठी एक नवा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमुळे वापरकर्त्यांना सतत रिचार्ज कराण्याची आवश्यकता नाही. कंपनीने हा Jio प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला आहे

Jio's big bang: Recharge once a year and 2.5GB of data per day for free
Jio चा मोठा धमाका : वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज अन् दररोज 2.5GB डेटा फ्री

तुम्हीही जिओ युजर्स आहात का?  तुमच्यासाठी जिओने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. टेलीकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या युजर्ससाठी एक नवा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमुळे वापरकर्त्यांना सतत रिचार्ज कराण्याची आवश्यकता नाही. कंपनीने हा Jio प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला आहे, या नवीन प्लॅनच्या किंमतीबद्दल आणि या प्लॅनमधून यूजर्सना काय फायदा मिळेल हे जाणून घेऊया. या प्लॅनसह रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना केवळ या प्लॅनचे फायदेच मिळणार नाहीत तर Jiomart वरून खरेदी केलेल्या कोणत्याही गोष्टीवर 20 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

या प्लॅनसह, कंपनी दररोज 2.5 GB डेटासह 365 दिवसांची वैधता देते, या प्लॅननुसार एकूण 912.5 GB डेटा तुम्हाला देईल. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस फ्री असणार आहेत. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये Jio Cinema , Jio Tv, Jio Cloud आणि Jio सिक्युरिटीचा मोफत प्रवेश दिला जातो.

जिओने १ रुपयाचा प्लॅन केला लाँच

रिलायन्स जिओने (Reliance Jio) अलीकडेच आपले प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) महाग केले होते. पण आता नव-नवीन प्लॅन्स गुपचूप जिओ लाँच करत आहे. काही दिवसांपूर्वी ११९ रुपयांचा प्लॅन रिलायन्स जिओने लाँच केला होता. आता १ रुपयाचा पॅक लाँच केला आहे. हा प्लॅन जिओच्या मोबाईल अॅपवर दिसत आहे. परंतु वेबसाईटवर सध्या त्याची नोंद केली नाही. हा पॅक तुम्ही वॅल्यू सेक्शनमध्ये पाहू शकता. याला वॅल्यू सेक्शनच्या Other Plans मध्ये लिस्ट केले गेले आहे.


हे ही वाचा – Sulli Deal App: सुली डील अॅप प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, मुस्लिम महिला टार्गेटवर