Jio Price Hike: जिओचा स्वस्त प्लॅन १५० रुपयांनी महागला, ग्राहकांना झटका

जिओने (Jio) सामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या प्लॅनमध्ये (Jio Plan) काही मोठे बदल केले आहेत. जिओने स्वस्त आणि ग्राहकांना परवडणारा प्लॅन महाग केल्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. या स्वस्त प्लॅनची किंमत १५० रूपयांनी वाढवण्यात आली आहे. कंपनीचा हा प्लॅन कमी किमतीत एक वर्षाच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजर्सना कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससोबतच इतरही अनेक फायदे मिळतात. मात्र, आता काही प्लॅन्समध्ये बदल करण्यात आले आहेत.

स्वस्त रिचार्ज अचानक महागले

कंपनी Jio फोनसाठी विविध प्रकारचे प्लॅन्स ऑफर करते. कंपनीने अशाच एका रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. खरंतर, ७४९ रुपयांचा प्लॅन होता. या प्लॅनमध्ये यूजर्सना एका वर्षासाठी व्हॉईस कॉलिंग आणि 24GB डेटा मिळत होता. या प्लॅन्समध्ये युजर्स जिओ अॅप्सच्या फ्री सब्सक्रिप्शनचाही लाभ घेऊ शकतात. हा प्लॅन अजूनही सुरूच आहे. मात्र, कंपनीने त्याची किंमत वाढवली आहे.

हेही वाचा : Jio चा मोठा धमाका : वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज अन् दररोज 2.5GB डेटा फ्री

या प्लॅन सर्वच युजर्ससाठी नसून कंपनीची ही ऑफर केवळ जिओ फोन युजर्ससाठी आहे. देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. यामध्ये प्रीपेड, पोस्टपेड आणि स्पेशल रिचार्जचे प्लॅन उपलब्ध आहेत. जिओने कोणतीही माहिती न देता अचानकपणे हा प्लॅन १५० रुपयांनी महाग केला आहे. त्यामुळे आता JioPhone वापरकर्त्यांना या प्लॅनसाठी ८९९ रुपये मोजावे लागणार आहेत.


हेही वाचा :  जिओची नवी शक्कल, रिचार्ज केल्यानंतर मिळणार फ्री टॉकटाईम