घरताज्या घडामोडीविचारस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते उद्योजक..,एलॉन मस्कचं जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन

विचारस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते उद्योजक..,एलॉन मस्कचं जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन

Subscribe

प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक आणि टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी सोशल मीडियातील लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेतली आहे. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अशातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मस्क यांचे मनापासून अभिनंदन केले आहेत. तसेच त्यांनी आशावादही व्यक्त केला आहे.

विचारस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते उद्योजक एलॉन मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्स देऊन ट्विटर विकत घेतलं आहे. अभिनंदन आणि आशावाद!, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानं आता लोकांच्या विचारस्वातंत्र्याचं रक्षण केलं जाईल, त्यामुळं हे आशादायी चित्र असल्याचं मत आव्हाडांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर किंमतीला जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला खरेदी केले आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आता अब्जावधी युजर्स असलेल्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंट्रोल ठेवणार आहे. मस्क यांचा ट्विटर खरेदीचा करण्याचा करार यावर्षी पूर्ण होणार आहे. तसेच यात अनेक मोठे बदल दिसणार आहेत.

- Advertisement -

लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वांचं पालन करतं की नाही, याबद्दल खात्री नाही. आपण ट्विटरमध्ये अनेक नवे फीचर्स आणणार आहोत. तसंच अल्गोरिदम्स, बॉट्समध्येही बदल करणार आहोत, असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं.

एलॉन मस्क यांनी गुरुवारी सांगितले होते की, त्यांनी व्यवहारासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी जवळपास ४६.५ अब्ज डॉलर्स सुरक्षित केले आहेत. याशिवाय, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेण्यासाठी कंपनीच्या धारकांना थेट आवाहन करण्याचा विचार करत आहेत.


हेही वाचा :  https://www.mymahanagar.com/desh-videsh/elon-musk-announces-new-twitter-changes-as-musk-got-full-control-on-twitter/429185/


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -