मुंबई : केंद्र सरकारने सैनिक शाळांची दारे खासगी क्षेत्रासाठी खुली केल्यानंतर, 62 टक्के नवीन सैनिक शाळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
आमदार आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. ‘अग्निवीर’ योजनेद्वारे देशाच्या संरक्षण क्षेत्राशी तडजोड करणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने छुप्या पद्धतीने आणखी एक चाल खेळली आहे. मे 2022 ते डिसेंबर 2023मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपा नेत्यांशी संबंधित तब्बल 40 शिक्षण संस्थाना सैनिक शाळा चालवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Gaurav Vallabh Resigns: काँग्रेस दिशाहीन झाली आहे… का म्हणाले गौरव वल्लभ असं?
देशातील लाखो लहान मुले-मुली मोठे होऊन संरक्षण दलात जाण्याचे आणि आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहतात. लहान वयातच मुलांना विशिष्ट विचारसरणीच्या शाळांमधून सैनिक प्रशिक्षण दिले गेले तर, त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन दूषितच राहणार. भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीला हे शोभणारे नाही, असे सुनावून आव्हाड म्हणाले की, आमचे संरक्षण दल जगातील सर्वोत्तम दल आहे, त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू नका. भारताचा हिंदू तालिबान किंवा पाकिस्तान होऊ द्यायचा नसेल तर भाजपाचे हे मनसुबे आत्ताच हाणून पाडले पाहिजेत.
‘अग्नीवीर’ योजनेद्वारे देशाच्या संरक्षण क्षेत्राशी तडजोड करणा-या केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारने छुप्या पद्धतीने आणखी एक चाल खेळली आहे. मे २०२२ ते डिसेंबर २०२३ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप नेत्यांशी संबंधित तब्बल ४० शिक्षण संस्थाना सैनिक… pic.twitter.com/KJWUbkmw4w
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 4, 2024
काय आहे प्रकरण?
यासंदर्भात द रिपोटर्स कलेक्टिव्हने यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे. केंद्र सरकारची प्रसिद्धी पत्रके तसेच माहिती अधिकारअंतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमधून सैनिकी शाळांबद्दलची माहिती समोर आली. आतापर्यंतच्या 40 सैनिक शाळांच्या झालेल्या करारांपैकी किमान 62 टक्के करार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याच्या सहयोगी संघटना, भाजपाचे नेते, त्यांचे राजकीय मित्रपक्ष आणि मित्र, हिंदुत्ववादी संघटना यांच्याशी संबंधित असल्याचा आमचा निष्कर्ष असल्याचे द रिपोटर्स कलेक्टिव्हने म्हटले आहे.