घरदेश-विदेशJITENDRA AWHAD ...संविधान कितीही वाईट असले तरी...

JITENDRA AWHAD …संविधान कितीही वाईट असले तरी…

Subscribe

ठाणे : केंद्रीय यंत्रणांना आपल्या फायद्यासाठी वापरण्यावरून विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत असतात. नुकत्याच झालेल्या चंदीगड येथील महापौर पदाच्या निवडणुकीत देखील हाच अनुभव आला. भाजपचे बहुमत नसताना देखील येथे त्यांचाच महापौर निवडून आला. याविरोधात आम आदमी पक्ष थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत निवडणुकीचा व्हिडीओ बघून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड देखील भडकले, आणि त्यांनी ही तर लोकशाहीची हत्याच आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. आव्हाड म्हणतात, “संविधान कितीही वाईट असले तरी अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ते चांगलेच असल्याचे सिद्ध होईल.”

हेही वाचा – Amruta Fadnavis : “….मी आणलंय विकासाचं वाण”, अमृता फडणवीसांच्या उखाण्याची सर्वत्र चर्चा

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

चंदीगड येथील महापौर पदाच्या निवडणुकीत देखील हाच अनुभव आला. भाजपचे बहुमत नसताना देखील येथे त्यांचाच महापौर निवडून आला. आणि तेथे बहुमतात असलेल्या आम आदमी पक्षाने अर्थात आपने याचा निषेध केला. केवळ निषेध करून ते थांबले नाहीत तर या विरोधात त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत निवडणुकीचा व्हिडीओ बघून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड भडकले, आणि त्यांनी ही तर लोकशाहीची हत्याच आहे, अशा शब्दात संताप व्यक्त केला.

ट्वीटमध्ये आव्हाड काय म्हणतात?

सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेनंतर आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचाच हवाला दिला आहे. पक्षीय राजकारणात नेहमी देशच मोठा ठरायला हवा, असा डॉ. आंबेडकर यांच्या भाषणाचा अर्थ आहे.
देशाचे सरन्यायाधीश मा. धनंजय चंद्रचूड यांनी चंदीगड महापौर निवडणुकीत घडलेला गैरप्रकार हा “लोकशाहीची थट्टा” की “लोकशाहीची हत्या” आहे. असे स्पष्टपणे सांगितले आहे. मा. सरन्यायाधिष्यांनी केलेले वक्तव्य हे मनाला अस्वस्थ करणारे आहे. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 ला केलेल्या भाषणाचे पुन्हा स्मरण होणे गरजेचे आहे.
25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारत आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवील की पुन्हा गमावेल, हा विचार मला अस्वस्थ करतो. असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की, त्याने आपले स्वातंत्र्य स्वकियांच्या फितुरीमुळेच गमावले आहे. देशफितुरीचा इतिहास मला सर्वाधिक बेचैन करतो. इतिहासाची पुनरावृत्ती होईल का..? या विचाराने मी चिंताग्रस्त आहे.भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देश मोठा मानतील? मला माहीत नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की, जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशाने मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धाराने लढलेच पाहिजे.’’ देश सर्वत्र व देशहितच सर्वोच्च मानून जबाबदारी पार पाडणे हीच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची नैतिकता आहे..!
संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ते वाईटच असल्याचे सिद्ध होईल..!
तथापि संविधान कितीही वाईट असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ते चांगलेच असल्याचे सिद्ध होईल..!

- Advertisement -

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाबद्दल जी चिंता व्यक्त केली होती ती पूर्णपणे अंमलात येतांना दिसतं आहे. लोकशाहीची थट्टा तर होतेच आहे पण लोकशाहीची हत्या आपल्या डोळ्यांसोमोर होतांना दिसतं आहे..!

-डॉ. जितेंद्र आव्हाड..!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -