घरदेश-विदेशबहुजन राही उपाशी आणि... जातनिहाय जनगणनेवरून जितेंद्र आव्हाड यांची भाजपावर टीका

बहुजन राही उपाशी आणि… जातनिहाय जनगणनेवरून जितेंद्र आव्हाड यांची भाजपावर टीका

Subscribe

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना काल, बुधवारी भारत सरकारमधील सचिवांमध्ये ओबीसींचा असलेले प्रमाण तसेच जातनिहाय जनगणनेच्या मुद्दा मांडला होता. तोच संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – काहींचा अहंकार दुखावला गेल्याने…, नव्या संसद भवनावरून ठाकरे गटाचा आरोप

- Advertisement -

लोकसभेत बुधवारी महिला आरक्षण विधेयक 454 मतांनी संमत करण्यात आले. त्यापूर्वी या विधेयकावर सभागृहात चर्चा झाली. महिला आरक्षण विधेयक अत्यंत महत्त्वाचे असून या विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी. पुनर्रचना आणि जनगणनेची गरज नाही. महिलांना थेट 33 टक्के आरक्षण द्या, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. हे विधेयक अंमलबजावणीसाठी बनवले गेले नसून अदानी प्रकरण आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष वळवण्यासाठी आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

हे विधेयक अपूर्ण आहे. यात ओबीसी आरक्षणाचाही समावेश असावा, असे सांगून ते म्हणाले, देशात ओबीसी किती, दलित किती, आदिवासी किती हा प्रश्न आहे. याचे उत्तर जातनिहाय जनगणनेतूनच मिळू शकेल. भारतातील 90पैकी केवळ तीन सचिव ओबीसी समुदायाचे आहेत. हे ओबीसी सचिव भारताचा केवळ पाच टक्के अर्थसंकल्प नियंत्रित करतात, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा – हाच तुमचा सनातन धर्म का? नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून उदयनिधींचा भाजपला सवाल

राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेतील राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करून भाजपावर टीका केली आहे. भारतीय समाज जाती-जातींनी बनला असेल तर त्या जातींची समाजाची जनगणना झालीच पाहिजे. कळायला हवे की, कोण किती आहेत आणि त्यांना किती मिळते आहे? दूध का दूध आणि पानी का पानी, होऊन जाऊ द्या, असे सांगतानाच, बहुजन राही उपाशी आणि हे भांडणे करून खातात तुपाशी, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -