J&K Encounter : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

या वर्षातील 9 दिवसांमधील ही सातवी चकमक आहे, ज्यामध्ये सुरक्षा दलांना आतापर्यंत 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

J&K Encounter jammu kashmir kulgam encounter 2- terrorist killed by security forces
J&K Encounter : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी दोम दहशतवाद्यांचा केला खात्मा

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. अशातच रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर दहशवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. रविवारी दुपारपासूनच ही चकमक सुरू होती. यावेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं आहे. आता या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरु आहे.


कुलगामधील हुसैनपुरा गावात रविवारी रात्रभर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरु आहे. दरम्यान ठार झालेले दोघेही दहशतवादी स्थानिक असून ते अलबद्र मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. मात्र दोघांच्या नावाबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रविवारी दोन दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यावेळी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु करत दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले. या वर्षातील 9 दिवसांमधील ही सातवी चकमक आहे, ज्यामध्ये सुरक्षा दलांना आतापर्यंत 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

यापूर्वी, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, बडगाम जिल्ह्यातील जोलवा गावात गुरुवारी उशिरा चकमक सुरू झाली. चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले, “मारले गेलेले सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. चकमकीच्या ठिकाणाहून तीन एके ५६ रायफल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.


न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 63 जखमी