Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी जम्मू कश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी, दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

जम्मू कश्मीरमधील रामबनमध्ये ढगफुटी, दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

Subscribe

जम्मू कश्मीरमधील रामबन जिल्ह्यातही ढगफुटीनंतर दरड कोसळल्याची घटना घडली. यात दोन जणांचा मृत्यू झाला.

देशभरात विविध राज्यात पावसाने थैमान घातले असून डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे ढगफुटी आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. याचदरम्यान, जम्मू कश्मीरमधील रामबन जिल्ह्यातही ढगफुटीनंतर दरड कोसळल्याची घटना घडली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. याचपार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

रामबन जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळी पावसाचा जोर वाढला आणि डोंगराळ भागात ढगफुटी झाली. यावेळी डोंगराजवळील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. यात अनेक घरे वाहून गेली. यात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान,दरड कोसळून राष्ट्रीय महामार्गावर मोठे दगड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे तावी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना सुरक्षित स्थळी हवलण्यात येत आहे.

हिमाचल, कुल्लूमध्येही ढगफुटी

- Advertisement -

बुधवारी रात्री तीनच्या सुमारास हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातही ढगफुटीमुळे अनेक दुकाने पाण्यात वाहून गेली. अचानक वाढलेल्या पावसाच्या प्रवाहात येथील १० हून अधिक दुकाने आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन कार वाहून गेल्या.

 

- Advertisment -