घरताज्या घडामोडीजम्मू कश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, एकास अटक

जम्मू कश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, एकास अटक

Subscribe

जम्मू कश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तान आणि कश्मीरमधील दहशतवादी संघटना अधिक सक्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू कश्मीरमधील राजकारण्यांच्या बैठकीमुळे दहशतवादी संघटना चवताळल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या एका दहशतवाद्याला जम्मू कश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडून पाच किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. (jk terriorist act 370 modi mufti farooq abdulh meeting lashkar a toiba ) नदीम उल हक असे त्याचे नाव असून तो बनिहालचा रहीवाशी आहे. तर त्याचा साथीदार फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा दहशतवादी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या द रजिस्टेंस फ्रंट संघटनेशी संबंधित आहे. जम्मू शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर नदीमचा साथीदार फऱार असून तो पाकिस्तानमधील मुलतानचा रहीवाशी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जम्मू कश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तान आणि कश्मीरमधील दहशतवादी संघटना अधिक सक्रिय झाल्या आहेत. याआधीही त्यांनी जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता. पण पोलिसांनी त्यांचे सर्व कट उधळून लावला होता.


हेही वाचा – जम्मू विमानतळावर ५ मिनिटात दोन स्फोट, स्फोटासाठी दोन ड्रोनचा वापर

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -