घरदेश-विदेशजम्मू कश्मीरमध्ये ८ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफच्या टीमवर बेछूट गोळीबार

जम्मू कश्मीरमध्ये ८ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफच्या टीमवर बेछूट गोळीबार

Subscribe

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहरा पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएच्या टीमवर बेछूट गोळीबार केला.

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहरा पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएच्या टीमवर बेछूट गोळीबार केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू कश्मीरमध्ये गेल्या ८ तासात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

- Advertisement -

हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त शोध मोहिम राबवली असून अनेक भागांना घेराव घातला आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या संयुक्त नाका पार्टी पथकावरच गोळीबार केला. यावेळी बिजबेहरा ठाण्यात ड्यूटी करणारे ठाणाप्रमुख जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आठ तासात हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याआधी बांदीपोरा येथे काम करणाऱ्या बिहारी मजुराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गेल्या १० महिन्यात दहशतवाद्यांनी जम्मू कश्मीरमध्ये बिहारमधील ७ जणांची गोळ्या घालून हत्या केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -