घरदेश-विदेशJNU Violence: जेएनयूचं नाव बदलून वीर सावरकर ठेवण्याची हिंदू महासभेची मागणी, गृहराज्यमंत्र्यांना...

JNU Violence: जेएनयूचं नाव बदलून वीर सावरकर ठेवण्याची हिंदू महासभेची मागणी, गृहराज्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

Subscribe

या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी सरकारकडे जेएनयूचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. जेएनयूचे नामकरण वीर सावरकरांच्या नावावर करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या नावाने लिहिले आहे.

नवी दिल्लीः देशाच्या राजधानीतील जवाहरलाल युनिव्हर्सिटीमध्ये डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेदरम्यान जोरदार झटापट झाली. ABVP चे लोक त्यांना मांस खाण्यापासून रोखत असल्याचा आरोप डाव्या गटाच्या विद्यार्थ्यांनी केला. मांस खाऊ न देणे हा मुद्दा नव्हता, तर खरा मुद्दा रामनवमीच्या पूजेत अडथळा आणण्याचा होता, असंही अभाविपने स्पष्ट केलं.

या वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी सरकारकडे जेएनयूचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. जेएनयूचे नामकरण वीर सावरकरांच्या नावावर करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या नावाने लिहिले आहे. पत्रात लिहितात की, “जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही फुटीरतावादी आणि तुकडे-तुकडे गँगकडून देशविरोधी घटकांच्या संगनमताने देशाविरुद्ध घोषणाबाजी केली जाते आणि असे दिसते की, पाकिस्तानच्या इशार्‍यावर देशाविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. देशाचे तुकडे करण्याची त्यांची इच्छा आहे. कधी हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केला जातो, तर कधी आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते वीर सावरकरांचा अपमान होतो. जेएनयूचे नाव वीर सावरकर विद्यापीठ करावे आणि बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मी विनंती करतो, असे त्यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

- Advertisement -

जेएनयू पुन्हा एकदा वादात सापडले आहे. खरं तर रामनवमीच्या दिवशी आयोजित केलेल्या पूजेबाबत अभाविपने आरोप केला आहे की, कावेरी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी रामनवमीच्या दिवशी कॅम्पसमध्ये ‘हवन-पूजन’ करत होते. त्यामुळे डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा आरोप आहे की, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी द्वेषाचे राजकारण करून कावेरी वसतिगृहातील वातावरण खराब केले. त्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. ABVP मेस कमिटीला रात्रीच्या जेवणात बदल करण्याची धमकी देत ​​असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. मांसाहार देऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. याशिवाय अभाविपच्या लोकांनी मेसमधील लोकांना आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. अशा परिस्थितीत जेएनयू प्रशासनाने विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरात शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचाः गुणरत्न सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ, न्यायालयाचा मोठा निर्णय

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -