जेएनयू: हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली

सोमवारपासून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे.

JNU Violence: Some Masked JNU Attackers Identified
जेएनयू: हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची पटली ओळखी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काही बुरखा घातलेल्या तरुणांनी ५ जानेवारीच्या रात्री हल्ला केला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आयेषी घोष यांच्यासह अनेकजण जखमी झाले. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला. तर या हल्ल्यामागे एसएफआयसारख्या डाव्या विद्यार्थी संघटना असल्याचे विद्यार्थी परिषदेने म्हटले होते. मात्र आता जेएनयूत हल्ला करणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचं समोर आलं आहे. तसंच पोलिसांनी त्यांना चौकशीसाठीची नोटीस देखील पाठवली आहे. सोमवारीपासून या विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे.

या विद्यार्थ्यांची क्राइम ब्रांचला चौकशी होणार नसून त्यांनी दिलेल्या ठिकाणी आणि वेळेत ही चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी महिला अधिकारी करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. याशिवाय चौकशी दरम्यान आणखी विद्यार्थ्यांची ओळख पटवली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वेळेत चौकशी केली जाणार आहे. संशयास्पद असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी नंतर केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.


हेही वाचा – केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ