घरताज्या घडामोडी'Google'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; महाराष्ट्रातील 'या' शहरात होतंय गुगलचं नवं ऑफिस

‘Google’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; महाराष्ट्रातील ‘या’ शहरात होतंय गुगलचं नवं ऑफिस

Subscribe

'गुगल' ही कंपनी भारतात एक नवे कार्यालय सुरु करणार आहे. गुगलचे हे नवे कार्यालय पुण्यामध्ये असणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासानुसार आयटी क्षेत्राचीही प्रचंड गतीनं प्रगती होत आहे.  भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय गुगलने घेतला आहे. जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी मोठा निर्णय गुगलने घेतला आहे.

‘गुगल’ ही कंपनी भारतात एक नवे कार्यालय सुरु करणार आहे. गुगलचे हे नवे कार्यालय पुण्यामध्ये असणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासानुसार आयटी क्षेत्राचीही प्रचंड गतीनं प्रगती होत आहे.  भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय गुगलने घेतला आहे. जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी मोठा निर्णय गुगलने घेतला आहे. भारतामध्ये गुगल क्लाउड इंजिनीयरिंगचे वीपी अनिल भन्साळी यांनी सांगितले की, भारत हा नेहमीच टेक्नोलॉजी आणि इनोवेशनचा मोठा हब आहे. त्यामुळे गुगल क्लाउडसाठी आवश्यक असणारे टॅलेंट पूर्ण भारतात आहे. त्यामुळे भारत हे गुगलसाठी एक विशेष लोकेशन आहे. Google ने गेल्या वर्षी देशातील दुसरा क्लाउड एरिया सुरु केला आहे. दिल्ली-NCR मध्ये आणि सरकारी क्वार्टरच्याजवळ सर्व आकारांच्या व्यवसायांना विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देण्यासाठी गूगलनं हे सुरु केलं आहे.

विशेष म्हणजे आता या वर्षी Google पुण्यातही आपलं क्लाउड संबंधी ऑफिस सुरु करणार आहे. भन्साळी म्हणाले की, आयटी हब म्हणून पुण्यातील गुगलचा विस्तार गुगलला अव्वल टॅलेंटमध्ये सहभागी होण्यास मदत करेल. वाढत्या ग्राहक वर्गाला प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी Google हे कार्यालय उघडत आहे. पुणे कार्यालय Google क्लाउडच्या जागतिक अभियांत्रिकी संघांच्या सहकार्याने प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करेल, रिअल-टाइम तांत्रिक सल्ला आणि उत्पादन आणि अंमलबजावणी कौशल्य प्रदान करेल. त्यामुळे राज्यातील आणि देशभरातील अनेक तरुण तरुणींना, फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी नोकरीची दारं उघडणार आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – पूनम महाजनांच्या संतापानंतर राऊतांनी ते ट्विट केलं डिलीट, काय होतं ट्विट? जाणून घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -