घरदेश-विदेशजोधपूरमध्ये ईदच्या पूर्वसंध्येला ध्वज, लाऊडस्पीकरवरून हिंसाचार; दोन गटांत दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, इंटरनेट...

जोधपूरमध्ये ईदच्या पूर्वसंध्येला ध्वज, लाऊडस्पीकरवरून हिंसाचार; दोन गटांत दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, इंटरनेट बंद

Subscribe

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरून सुरु असलेल्या वादाची ठिणगी आता थेट राजस्थानपर्यंत जाऊन पोहचली आहे. राज्स्थानच्या जोधपूरमध्ये सोमवारी रात्री ध्वज आणि लाऊडस्पीकरवरून दोन गटात हाणामारी झाली आहे. यादरम्यान रात्री साडे अकराच्या सुमारास जालोरी गेट चौकात दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि आरएसी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत घातल्यानंतर प्रकरण शांत झाले. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा दगडफेकीचे वृत्त समोर आले. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

दरम्यान पोलिसांकडून सोमवारी रात्रीपासूनचं हल्लखोरांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. जालोरी गेट आणि ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

जोधपूरमधील जालोरी गेट चौकातील स्वातंत्र्यसैनिक बाळ मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर ध्वज बसविण्यावरून आणि मंडळावर ईदशी संबंधित बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वादाला सुरुवात झाली. याशिवाय ईदच्या नमाजासाठी चौकाचौकात लाऊडस्पीकर लावण्यावरूनही संतप्त नागरिक जमा झाले.

यावेळी जमावावे घोषणाबाजी करत झेंडे आणि बॅनर हटवले. यावेळी मोठा वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोंधळ सुरू होता. यावेळी संतप्त जमावाने झेंडे आणि बॅनर काढून टाकले. यावेळी सक्रिय जमावाने चौकाचौकात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. दगडफेक केली, लाऊडस्पीकर लावून गर्दी उसळल्याने पोलिसांनी हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौम्य पोलीस बळाचा वापर केला. पोलिसांनी जालोरी गेट ते ईदगाह रोडपर्यंत पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस पथके तैनात करण्यात आली.

- Advertisement -

मुख्यमंत्री गेहलोत यांनी केले ट्वीट

या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, “जोधपूरच्या जालोरी गेट येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करत मी सर्व पक्षांना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो.


PM Modi Europe Visit : जर्मनीची मोठी घोषणा; भारताच्या हरित प्रकल्पांसाठी 2030 पर्यंत 10 अब्ज युरोची देणार मदत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -