घरताज्या घडामोडीमास्क न घातल्यामुळे पोलिसाने तोंडावर गुडघा ठेऊन मारहाण; नेटकऱ्यांनी केली जॉर्ज फ्लॉइडच्या...

मास्क न घातल्यामुळे पोलिसाने तोंडावर गुडघा ठेऊन मारहाण; नेटकऱ्यांनी केली जॉर्ज फ्लॉइडच्या घटनेशी तुलना

Subscribe

जोधपूरमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजस्थानच्या जोधपूर येथे अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइ़ड यांच्या घटनेसारखा प्रकार घडला आहे. मास्क न घातल्यामुळे एका पोलीसाने त्या व्यक्तीच्या तोंडावर गुडघा टेकून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकरी या घटनेची तुलना जॉर्ज फ्लॉइड यांच्या घटनेशी करत आहेत. या व्हिडिओ त्या व्यक्तीला दोन पोलिस मारहाण करताना दिसत आहे.

- Advertisement -

गुरुवारी दुपारी जोधपूरमधील एक थिएटरच्या समोर ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांना असा दावा केला आहे की, मुकेश कुमार प्रजापत या नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा हल्ला केल्यावर कॉन्स्टेबलने त्याला प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश रागाच्या भरात आक्रमकपणे वागत होता. आज त्याला न्यायालयात हजर केले असता तिथून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रताप नगरमधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने मास्क घातला नव्हता आणि पोलिसांशी त्याने भांडण केले. त्याने गणवेशही फाडला. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यात मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. याबाबत दोन्ही कॉन्स्टेबलने प्रजापत सांगितलं तेव्हा त्यानं पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि धमकावलं. या व्यक्तीच्या विरोधात एक जुना खटला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याच्या वडिलांनी आपला डोळा खराब केल्याचा आरोप केला होता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांनी प्रजापतच्या या प्रकरणाची तुलना जॉर्ज फ्लॉइड या घटनेशी केली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीने ३.६ कोटींची केली कमाई!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -