Corona: सोशल डिस्टन्सिंगसाठी दुधवाल्याचा देशी जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल

कोरोना व्हायरस संक्रमणासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगचे अत्यंत महत्त्व आहे. यासाठी संजय गोयल यांनी देशी जुगाड केल्याचे समोर आले आहे.

असे म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. या कोरोना व्हायरस संकटाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग कायम राखण्यासाठी अनेक देशी युक्त्या लढवल्या जात आहेत. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये बघायला मिळाला. राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी असलेला संजय गोयल ही व्यक्ती सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. त्याची दूध विकण्याची कला लोकांना चांगलीच आवडत आहे. कोरोना व्हायरस संक्रमणासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगचे अत्यंत महत्त्व आहे. यासाठी संजय गोयल यांनी देशी जुगाड केल्याचे समोर आले आहे. ते आपल्या ग्राहकांना एका पाईपद्वारे दूध पुरवतात ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे.

सोशल डिस्टन्सिंगसाठी तयार केली मिल्क गन

घरोघरी दूध विक्री करणार्‍या सरदारपुरा येथील रहिवासी संजय गोयल यांनी ही मिल्क गन तयार केली आहे. संजय सरदारपुरा भागात दुधाचा पुरवठा करतो. शहरातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता संजयने ग्राहकांना दूध देताना सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी मिल्क गन तयार केली आहे. ही तयार केलेली मिल्क गन आणि या दुध विक्रेत्याची अनोखी शक्कल सध्या सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून चांगलीच चर्चेत आहे.

अशी लढविली त्याने शक्कल

मिल्क गन तयार करण्यासाठी संजयने जवळपास २ गज लांबीच्या पीव्हीसी पाईपच्या वापर केल्याचे दिसतेय. त्या पाईपच्या एका बाजूला तोटी तर दुसर्‍या बाजूला एल आकारात नळ लाऊन तो नंतर लाकडी दांड्याच्या सहाय्याने बांधला. संजयच्या या अनोख्या प्रयोगातून दूध घेत असलेल्या ग्राहकांचे खूप कौतुक होत आहे.


व्हॉट्सअ‍ॅप करा.. टोकन मिळवा अन् वाईन घेऊन जा