घरताज्या घडामोडीजो बायडेनची व्लादिमीर पुतिनसोबतची बैठक संपली, सायबर हल्ल्यांसह सुरक्षेबाबत चर्चा

जो बायडेनची व्लादिमीर पुतिनसोबतची बैठक संपली, सायबर हल्ल्यांसह सुरक्षेबाबत चर्चा

Subscribe

सायबर क्राईम, अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप यासारख्या मुद्द्यांवर देखील चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठक संपली आहे. दोन्ही राष्ट्राध्याक्षांची बैठक जिनोवातील लेकसाइड विलामध्ये बैठक झाली आहे. व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, बायडेन आणि पुतिन यांच्यामध्ये दोन सत्रात बैठक झाली आहे. यातील पहिल्या सत्रात ९३ मिनीटांची बैठक झाली तर ४५ मिनीट नंतर ६५ मिनीट दुसरी बैठक झाली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी म्हटलंय की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत यूक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. यूक्रेनला नाटोमध्ये सामिल करण्याबाबत चर्चा करण्यासारखे काही नाही असे पुतिन यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि रशियाच्या दोन्ही राजदूत आपल्या पदावर पुन्हा कायम राहतील. अमेरिका आणि रशियाच्या सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरु करण्यात येणार आहे. दोन्ही देशांना आपल्या कामांबाबत जबाबदारी स्विकारणं गरजेचे आहे.

- Advertisement -

बैठकीपुर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी कॅमेऱ्यासमोर हस्तांदोलन केलं आहे. यावेळी स्वित्झर्लैंडचे पंतप्रधान पारमेलिन उपस्थित होते. पारमेलिन यांनी दोन्ही राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केलं आहे. यानंतर बायडेन आणि पुतिन यांच्यात बैठकीला गेले. ही बैठक दोन सत्रांत झाली असून तब्बल २ ते ३ तास बैठक झाली आहे. प्रसारमाध्यमांसमोर काढलेल्या फोटोवेळी दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी नजर मिळवली नाही असे काही तज्ञांनी म्हटलं आहे.

बैठकीपुर्वी पुतिन यांनी म्हटलं होतं की, बैठक सकारात्मक होईल अशी आपेक्षा आहे. तसेच बायडेन यांनी म्हटलं आहे की, समोरा-समोर भेटणे नेहमीच चांगले असते. बायडेन यांना विचारण्यात आले की, पुतिनवर विश्वास ठेवता येईल का तर उत्तरात बायडेन यांनी हो म्हटलं आहे. जो बायडेन यांनी दहा वर्षांनी प्रथमच रशियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. मार्च २०११ मध्ये पुतिन यांना जो बायडेन भेटले होते. त्यावेळी जो बायडेन यांनी पुतिन यांना हत्यारा आणि विरोधी म्हणून संबोधित केलं होते. परंतु आता भविष्यात शस्त्रांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सायबर क्राईम, अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप यासारख्या मुद्द्यांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. शिखर परिषदेत सामाजिक स्थैर्य,सायबर सुरक्षा, कोरोना वायरस अशा विषयांवर अधिक चर्चा करण्यात येणार आहे. सीरिया आणि लिबिया सारख्या प्रादेशिक संकटावरही चर्च करण्याची शक्यात आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -