घरट्रेंडिंगट्रम्पला टक्कर देणाऱ्या बिडेनच्या मुलाने Porn Site वर उडवले तब्बल १५ लाख...

ट्रम्पला टक्कर देणाऱ्या बिडेनच्या मुलाने Porn Site वर उडवले तब्बल १५ लाख रुपये

Subscribe

सध्या अमेरिकेतील निवडणूक हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांना जो बिडेन हे कडवी टक्कर देत असल्याचे प्रचार सभांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र जो बिडेन यांच्यासंदर्भातील एका कुप्रसिद्धीमुळे जनतेचा विश्वास संपादन करण्यास अयशस्वी ठरलीत, असे चित्र दिसत आहे. त्याला कारण आहे त्यांचा बिगडेल आणि अय्याश मुलगा. जो बिडेन यांचा मुलगा हंटर बि़डेन अमेरिकी मीडियामध्ये ओळखीचा चेहरा बनले आहेत. त्यांच्यासंबंधी काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

हंटर बिडेन यांच्या जुन्या लॅपटॉपमधून डेटा लीक झाला असून त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही धक्कादायक खुलासे सार्वजनिक झाले आहेत. डेली मेल वृत्तसंस्थेतील रिपोर्टनुसार, हंटर यांनी पॉर्न साईटसाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च केले असून न्यूयॉर्कच्या एका स्ट्रिप क्लबमध्ये एका रात्रीत ८ लाख रुयये उडवले असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हंटर यांच्या लॅपटॉपमधून आढळून आलेल्या डेटानुसार त्यांना ब्लॅकमेल केले जाऊ शकते. लीक झालेल्या डेटामध्ये ५० वर्षीय हंटन बिडेनने एका रात्रीसाठी हॉटेलच्या विविध रुम्समध्ये राहण्यासाठी पैसे खर्च केल्याचे निष्पन्न होते आहे. तसेच त्यांनी पॉर्न वेबसाईटवरील लाईव्ह शो पाहण्यासाठी तब्बल १५ लाख रुपये उवडल्याचेही दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Corona लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करा, केंद्राचे राज्यांना निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -