घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियाकडून येणाऱ्या तेल आयातीवर बंदी

Russia Ukraine War: अमेरिकेचा मोठा निर्णय; रशियाकडून येणाऱ्या तेल आयातीवर बंदी

Subscribe

युक्रेनवर हल्ल्या केल्यापासून रशिया जगभरातील लावलेले निर्बंध झेलत आहे. अनेक देशांनी रशियावर आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध लावले आहेत. तर जगातील मोठ्या कंपन्यांनी रशियाविरोधात पाऊल उचलले आहे. ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी शेलने म्हटले होते की, ‘रशियाकडून तेल आणि नैसर्गिक गॅस खरेदी करणे बंद करतील आणि रशियातील सर्व्हिस स्टेशनही बंद करतील.’ यामुळे रशियाला खूप मोठा झटका बसला आहे. अशात अमेरिकेने रशियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रशियाचे टेन्शन दुप्पट वाढणार आहे. अमेरिकेने रशियाकडून येणाऱ्या तेल आयतीवर बंदी घातली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या तेल आयातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम आणखीन वाढवण्यासाठी अमेरिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, याबाबतची माहिती द असोसिएटेड प्रेसने दिली आहे, असे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेने केले आहे.

- Advertisement -

दरम्यान जागतिक निर्बंध-ट्रॅकिंग डेटाबेसने आज एक यादी जारी केली. यामध्ये युक्रेनच्या हल्ल्यानंतर सर्वाधिक जास्त निर्बंध झेलणारा देश रशिया असल्याचे समोर आले आहे. डेटाबेस कॅस्टेलम डॉट एआयने म्हटले की, युक्रेनवर हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वी 22 फेब्रुवारीपासून रशियाने संयुक्त राज्य अमेरिका आणि त्याचे यूरोपीय सहाकार्यांद्वारे लावलेल्या निर्बंधात वाढ झालेले पाहिले.

- Advertisement -

कॅस्टेलम डॉट आयनुसार, २२ फेब्रुवारीच्या अगोदर रशियाविरोधात 2 हजार 754 निर्बंध लावले होते. परंतु त्यानंतर जसे जसे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धासंबंधित वक्तव्य केली तसतसे निर्बंध वाढू लागले. 2 हजार 778 नवे निर्बंध रशियावर लावले गेले.


हेही वाचा – Russia Ukraine News: भारताची प्रतिमा मलिन करण्याचा चीनचा डाव पीआयबी फॅक्टने उधळला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -