‘मला माझे आयुष्य पुन्हा मिळाले’; हाय प्रोफाइल मानहानी केसमधील विजयावर Johnny Depp ची प्रतिक्रिया

johnny depp welcomed defamation case verdict amber heard said heartbroken marathi news
'मला माझे आयुष्य पुन्हा मिळाले'; हाय प्रोफाइल मानहानी केसच्या विजयावर Johnny Depp प्रतिक्रिया

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री अंबर हर्ड (Amber Heard) यांच्यात सुरु असलेल्या हाय प्रोफाईल मानहानीच्या प्रकरणात बुधवारी ज्युरीने निर्णय दिला आहे. यात जॉनी डेपच्या बाजुने निकाल लागला आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून हा खटला सुरु (Defamation Case Verdict) होता. या निर्णयाचे जॉनी डेप याने स्वागत केले आहेय. डेपने निकालानंतर एक निवेदन जारी म्हटले की, ज्युरीने मला माझे आयुष्य परत दिले आहे. तर दुसरीकडे अंबर हर्ड हिने या निर्णयावर निराश व्यक्त करत हा निकाल ह्रदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. महिलांवरील हिंसाचाराचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, हा विचार या निर्णयामुळे मागे पडल्याचेही तिने यावेळी नमूद केले. (Johnny Depp And Amber Heard)

या प्रकरणातील आठ पानांच्या निकालपत्रात डेपने हार्डविरुद्धच्या खटल्याशी संबंधित 24 प्रश्न त्याच्याविरुद्धच्या बचावाशी संबंधित 18 प्रश्न होते. दरम्यान ही सर्व विधाने बदनामकारक होती हे दोघांनी सिद्ध करणे आवश्यक होते, यात भरपाई किंवा दंडात्मक नुकसान प्राप्त करण्यासाठी ज्युरीला हे शोधणे आवश्यक होते की, त्यांची विधाने वास्तविक द्वेषाने केली जात आहेत का? तसेच ही विधाने खरी की खोटी हे पडताळून पाहायचे होते. या प्रकरणात जॉनी डेपला पुर्वाश्रमीच्या पत्नीपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. हर्डला 15 मिलियन डॉलरची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

58 वर्षीय अभिनेता जॉनी डेपने 2018 साली ‘द वॉशिंग्टन’ पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखावरून माजी पत्नी अंबर हर्डविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. या लेखात त्याची माजी पत्नी अंबर हर्ड हिने स्वत:ला “घरगुती अत्याचाराचे प्रतिनिधित्व करणारी सार्वजनिक व्यक्ती” म्हटले होते. यानंतर अंबरनेही डेपवर मानहानीचा खटलाही दाखल केला होता. या हायप्रोफाईल प्रकरणाने जगभरात चर्चा झाली.

एका ट्रायल्सदरम्यान अंबर हर्डने तिच्या साक्षीत सांगितले की, पती डेप तिला मारहाण करायचा, तसेच डेपवर तिने लैंगिक हिंसाचाराचे आरोपही केले आहे. यावेळी डेपनेही हर्डवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. मात्र दोघांनीही एकमेकांवरील आरोप फेटाळून लावले.

दरम्यान कोर्टतील ट्रायल्सदरम्यान जॉनीची बाजू मजबूत दिसली. अखेर जॉनी डेप आणि अंबर हर्ड या हायप्रोफाइल कायदेशीर लढाईत स्टार जॉनी डेपचा विजय झाला आहे. या खटल्यात ज्युरीने अंबर हर्डला मानहानीसाठी दोषी ठरवत तिने जाणीवपूर्वक जॉनी डेपची बदनामी केली, असा निर्णय दिला. तसेच डेपला 15 मिलियन डॉलर्स (सुमारे 116 कोटी रुपये) नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचवेळी हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 15.5 कोटी रुपये) भरपाई देण्याचा निर्णयदेखील देण्यात आला आहे. ज्युरीने डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड या दोघांनाही बदनामीसाठी जबाबदार धरले आहे.

या निकालानंतर डेप म्हणाला की, ज्युरीने मला माझे आयुष्य पुन्हा दिले आहे. सत्य कधीच हरत नाही. निकाल काहीही लागला असता, पण सत्य बाहेर आणणे हा या खटल्याचा उद्देश होता. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे आणि शेवटी एक नवीन अध्याय सुरू झाला आहे,

तर न्यायालयाच्या या निर्णयाला अंबर हर्डने महिलांसाठी निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. तिने म्हटले की, आज मला जी निराशा वाटतेय ती शब्दात व्यक्त करु शकत नाही. माझ्या पुर्वाश्रमीच्या पतीच्या अमर्याद शक्ती, प्रभाव आणि प्रसिद्धीचा सामना करण्यासाठी इतके पुरावे पुरेसे नव्हते याचे मला दु:ख आहे. जॉनी डेपचा खटला त्याच्या वकील केमिली वास्केज लढत होत्या.


Marathi Nameplates at Shops : मुंबईतील दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ